Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

प्रियांका चोप्राने उघड केले बॉलिवूडचे कटू सत्य; म्हणाली, ‘काळी मांजर म्हणायचे…’

प्रियांका चोप्रा आता केवळ बॉलीवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. प्रियांकाने ग्लोबल स्टार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे आणि आता देशातच नाही तर परदेशातही तिचे चाहते प्रचंड आहेत. आज लाखो हृदयांवर राज्य करणाऱ्या प्रियांका चोप्रालाही तिच्या रंगाबाबत बॉडी शेमिंगबाबत भेदभावाचा सामना करावा लागला. अलीकडेच, अभिनेत्रीने बॉलीवूड इंडस्ट्रीत तिच्याशी झालेल्या वाईट वागणुकीचा खुलासा केला आहे.

अभिनेत्री प्रियंका चोप्रा (priyanka chopra) हिने अलीकडेच बीबीसीच्या ‘100 महिलांच्या यादीत आपले नाव नोंदवले आहे. ही अभिनेत्री 2022 मधील सर्वात प्रभावशाली महिला बनली आहे. अशा परिस्थितीत माध्यमांशी संवाद साधताना तिने बॉलिवूडमध्ये तिच्यासोबत झालेल्या वर्णभेदाचा खुलासा केला. तिने सांगितले की, तिला मेल एक्टर्सच्या तुलनेत कमी पगार मिळायचा, सेटवर तासनतास थांबावे लागायचे आणि तिच्या रंगाबद्दल कटू शब्द ऐकावे लागले.

प्रियांका म्हणाली, “मला काळी मांजर आणि डस्की म्हटले जायचे. म्हणजे, डस्की म्हणजे काय? तेही अशा देशात जिथे प्रत्येकजण तपकिरी आहे. मी सुंदर नाही असे मला वाटू लागले. मला असे वाटायचे की, मला इतरांपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल, पण माझा असा विश्वास होता की, मी माझ्यापेक्षा हलक्या रंगाच्या अभिनेत्यांपेक्षा अधिक टॅलेंटेड आहे. पण मग मला असे वाटायचे की, सर्व काही ठीक आहे. कारण, हे सामान्य मानले जाते.”

प्रियांका चोप्राने 2002 मध्ये तिच्या अभिनय करिअरला सुरुवात केली होती. Thzmizhan या तमिळ चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ती अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली. तिने अनेकदा स्वतःसाठी आव्हानात्मक भूमिका निवडल्या आणि आपल्या चमकदार कामगिरीने देशातच नाही तर परदेशातही नाव कमावले. पण, बॉलीवूडमध्ये आलेले कटू अनुभव ही अभिनेत्री आजही विसरू शकलेली नाही.(bollywood actress priyanka chopra reveals she was called kaali billi due to dark skin only once received equal pay)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चित्रपटांमध्ये बिकिनी घालणाऱ्या पहिल्या अभिनेत्री होत्या शर्मिला टागोर, बोल्ड इमेजने लावली होती थेट संसदेपर्यंत आग

शर्मिला टागोरांनी बिकिनी घातल्यामुळे झाला होता मोठा वाद; फोटो पाहून टायगर पतौडींची होती ‘अशी’ प्रतिक्रिया

हे देखील वाचा