बॉलिवूडमधून आनंदाची बातमी येत आहे. अभिनेत्री दिया मिर्झा मागील महिन्यात १५ फेब्रुवारीला व्यावसायिक वैभव रेखीसोबत लग्नबंधनात अडकली होती. लग्नाच्या अवघ्या दीड महिन्यानंतर ती गरोदर आहे. दियाने ही आनंदाची बातमी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे. यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
दियाने गुरुवारी (१ एप्रिल) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती आपल्या बेबी बंपसह दिसत आहे. दियाने या फोटोसह एक सुंदर पोस्टही लिहिली आहे. याव्यतिरिक्त तिने हा फोटो तिचा पती वैभव रेखीने काढल्याचेही सांगितले आहे.
दिया आपल्या पतीसोबत मालदीवमध्ये हनीमूनचा आनंद लूटत आहे. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ ती सातत्याने सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. विशेष म्हणजेे आपल्या हनीमूनला दिया तिची सावत्र मुलगी समायरालाही घेऊन गेली आहे. वैभव रेखी आणि त्याची पहिली पत्नी सुनैना रेखीची मुलगी म्हणजे समायरा होय. समायराने दियाच्या लग्नातही हजेरी लावली होती.
दियानेही वैभव रेखीसोबत दुसरे लग्न केले आहे. यापूर्वी दियाने सन २०१४ मध्ये दीर्घ काळ डेट केल्यानंतर साहिल संघासोबत लग्नगाठ बांधली होती. तरीही, सन २०१९ मध्ये दोघांनीही एकमेकांच्या संमतीने घटस्फोट घेतला होता. दिया घटस्फोटाच्या खूप दिवसांआधी साहिलपासून वेगळी राहत होती. माध्यमांतील वृत्तांनुसार, दिया आणि वैभवमध्ये जवळीक वाढली. वैभव मुंबईचा मोठा व्यावसायिक आणि गुंतवणुकदार आहे.
दियाने सन २००० मध्ये मिस एशिया पॅसेफिक किताबावर आपले नाव कोरले होते. त्यानंतर तिने अभिनेता आर माधवनसोबत ‘रहना है तेरे दिल में’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. दिया शेवटची तापसी पन्नू अभिनित ‘थप्पड’ चित्रपटात दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मिशन मंगल’ फेम कीर्ती कुल्हारीची मोठी घोषणा; पती साहिल सेहगलपासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय
-‘सिंड्रेला’ बनत अभिनेत्री निया शर्माची साराला टक्कर; फोटो पाहून नेटकरी म्हणाले ‘जो नियासे जले…’
-किम कर्दाशियानची हॉटनेस पुन्हा एकदा चर्चेत! स्किन कलरच्या बिकिनी फोटोने केला सोशल मीडियावर राडा