ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचं वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं आहे. सुधीर नांदगावरकर हे 50 हून अधिक वर्ष प्रभात चित्रपट मंडळाचे काम पहात होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्यानं अखेर आज म्हणजेच रविवारी (दि. 1 जानेवारी )ला संध्याकाळी 5 वाजता त्यांनी माजीवाडा येथे अखेरचा श्वास घेतला.
मराठी सिनेसृष्टीत सुधीर नांदगावकर यांचं फार माेठ योगदान आहे. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य मराठी प्रेक्षकांना चित्रपटाशी जाेडण्यात घालवलं. चित्रपटक्षेत्रातील दांडगा अभ्यास असल्यामुळे सुधीर नांदगावकर यांच्या नावाला मनाेरंजनसृष्टीत एक वजन हाेतं. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीतील एक खरा अभ्यासक आणि चाहता हरपला आहे, अशी भावना सर्वजण व्यक्त करत आहे.
प्रेक्षकांची चित्रपटातील रुची वाढावी, तसेच प्रेक्षकांनी उत्तमोत्तम सिनेमे बघावे यासाठी नांदगावकर कायमच झटत राहिले. प्रभात चित्रपट मंडळाच्या वेगवेगळ्या चळवळीतून तसेच उपक्रमातून त्यांनी चित्रपट माध्यमाचा भरपूर प्रचार केला. नांदगावकर यांनी बऱ्याच चित्रपट महाेत्सवात परीक्षक म्हणून काम केले आहे.
सिनेमा या माध्यमावर नितांत प्रेम करणाऱ्या आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रचार करणाऱ्या सुधीर नांदगावकर यांच्या निधनाने प्रभात चित्र मंडळ आणि इतर काही संस्थेतील लाेक पोरके झाले आहेत.(sudhir nandgaonkar passed away)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
करिश्माच्या कतिलाना अदाने चाहत्यांना पडली भुरळ, फोटो गॅलरी तुमच्यासाठी
“डिप्रेशनशी लढण्यासाठी मला…”, हनी सिंगने शेअर केला मानसिक आजारपणातील अनुभव










