Friday, April 26, 2024

“डिप्रेशनशी लढण्यासाठी मला…”, हनी सिंगने शेअर केला मानसिक आजारपणातील अनुभव

यो यो हनी सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतेच हनी सिंगचे ‘याई रे’ हे गाणे रिलीज झाले आहे, जे चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. या गाण्यात त्याच्यासोबत युलिया वंतूर दिसत आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून हनी सिंग त्याच्या पत्नीसोबतच्या तुटलेल्या नात्यामुळेही चर्चेत आहे. अलीकडेच सिंगरने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि मानसिक आरोग्याविषयी सांगितले आहे.

माध्यमाना दिलेल्या मुलाखतीत हनी सिंग(honey singh) याने सांगितले की, “मी अनेक वर्षांपासून डिप्रेशनमध्ये आहे.” त्याच्या डिप्रेशनच्या दिवसांबद्दल बोलताना हनी सिंग म्हणाला की, “डिप्रेशनशी लढण्यासाठी मला औषधांचा सहारा घ्यावा लागला. आताही मी मानसिक आरोग्यासाठी औषध घेतो. मात्र, मी पूर्वी 200 मिलीग्राम औषध घेत असू, तर आता मी फक्त 5 मिलीग्राम इतके औषध घेताे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Yo Yo Honey Singh (@yoyohoneysingh)

मुलाखतीदरम्यान बोलताना हनी सिंगने त्याच्या एक्स पत्नीसोबतच्या विभक्त होण्याबाबतही खुलेपणाने सांगितले. हनी सिंग म्हणाला, “पत्नीसोबतच्या बिघडलेल्या नात्यामुळे मी खूप दुखावलाे हाेताे, पण काही लोकांनी मला माझ्या वाईट काळातही साथ दिली.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Tina Thadani (@tinathadani)

विशेष म्हणजे हनी सिंगच्या पत्नीने त्याच्यावर हिंसाचाराचा आरोप केला होता. दोघे आता वेगळे झाले असले तरी हनी सिंगला त्याचे नवे प्रेम मिळाले आहे. हनी सिंग टीना थडानीला डेट करत आहे. दोघेही अनेका कार्यक्रमात एकमेकांचा हात धरुन दिसतात.

टीना थडानी ही एक मॉडेल आहे जी अनेकदा रॅम्पवर चालताना दिसते. टीनाने 2008 मध्ये ‘द मोल’ आणि ‘ड्रिफ्टर्स अनारकली’ या चित्रपटात काम केले आहे. टीन हनी सिंगच्या ‘पॅरिस ट्रिप’ या गाण्यात आहे, या गाण्यादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि आता ते एकमेकांना डेट करत आहेत.

माध्यमातील वृत्तानुसार, हनी सिंग ड्रग ऍडिक्शनचा बळी ठरला होता आणि त्यातून मुक्त होण्यासाठी त्याला रिहॅबमध्ये जावे लागले होते. यानंतर 2019 मध्ये हनी सिंगने दुसऱ्या इनिंगमध्ये ‘मखना’ या गाण्याने धमाका केला. हनी सिंग अलीकडेच त्याची एक्स पत्नी शालिनी तलवारसोबत घटस्फोटामुळे चर्चेत आला होता. (bollywood singer honey singh was in depression for years know what the singer said about mental health)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आमिर खानचे करिअर ‘हा’ साऊथ सुपरस्टार नेणार यशाच्या शिखरावर, आगामी सिनेमासाठी केली हातमिळवणी?

मराठी अभिनेत्री भाग्यश्रीने हटके अंदाजात दिला 2022ला निरोप, पाहा फोटो

हे देखील वाचा