जगात खूप कमी लोकं श्रीमंत घरात जन्माला येतात आणि जन्मतः श्रीमंत म्हणून ओळखले जातात. मात्र इतर सर्वच लोकं गरीब घरात जन्म घेतात आणि स्वतःच्या मेहनतीच्या आणि कष्टाच्या जोरावर श्रीमंत होतात. असे लोकं श्रीमंत होत असताना इतरांना देखील प्रेरणा देतात. मनोरंजनक्षेत्रात पाहिले तर जवळपास सर्वच कलाकार हे त्यांच्या कष्टाने आणि प्रतिभेने मोठे झाले आहेत. त्यांना काहीही आयते मिळाले नाही. यातलेच एक नाव म्हणजे मिस्टर फैजू उर्फ फैजल शेख. सोशल मीडियावरील स्टार आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील मोठे नाव म्हणून फैजुला ओळखले जाते. नुकतीच त्याने मनीष पॉलला एक मुलाखत दिली ज्यात त्याने त्याचे कष्ट आणि स्टार होण्या आधीच्या आयुष्यावर दृष्टिक्षेप टाकला आहे.
View this post on Instagram
या मुलाखतीमध्ये फैजुने सांगितले की, तो एका गरीब घरातून आला आहे. आधी तो मुंबईच्या गल्ल्यांमध्ये फिरून कपडे विकायचा. त्याची यातून झालेली पहिली कमाई केवळ ५० रुपये होती. मात्र त्याना एवढीच हार मानली नाही आणि तो रोज कामात नवनवीन प्रयोग करत राहिला. त्याने त्याच्या आवडीची यूटुबवर डान्स आणि मिमिक्रीचे नवनवीन व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. हळूहळू त्याची फॅन फॉलोविंग वाढू लागली आणि तो नावारूपास आला. पुढे तो झलक दिखला जा आणि खतरो के खिलाडी या शोमध्ये दिसला.
View this post on Instagram
फैजलने पुढे सांगितले की त्याने काही दिवस एका परफ्युमच्या स्टोरमध्ये देखील काम केले आहे. तिथे एकापेक्षा एक महाग आणि सुंदर, सुवासिक परफ्युम असायचे. तिथे ३२ मुलींमध्ये काम करणारा फैजल एकमेव मुलगा होता. त्याने अजून एक किस्सा सांगितला यात तो म्हणाला, “एक दिवस संध्याकाळी एक सुंदर मुलगी स्टोरमध्ये आली. मी नेहमीप्रमाणे तिचा पकडून त्यावर परफ्युम लावले आणि तिचा हात हलवला. त्यानंतर त्याचा वास आला. मी त्या मुलीला बघण्यात इतका गुंतलो होतो की, माझ्या हातातून परफ्युमची बाटली सुटली आणि फुटली. ती बाटली १४ हजार रुपयांची होती. दुसऱ्या दिवशी मी कामावर गेलो तेव्हा सर्वानाच माझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल समजले होते. मी माझ्या मालकाकडे जाऊन माझ्या चुकीची कबुली दिली. तेव्हा त्यांनी ते नुकसान माझ्या पगारातून भरून घेणार असे सांगितले. तेव्हा मला ७ हजार पगार होता. मी त्या स्टोरमध्ये दोन महिने फ्री काम केले. त्यानंतर मी तो जॉब सोडला.”
यश मिळवल्यानंतर फैजलने स्वतःचा परफ्युमचा व्यवसाय सुरु केला असून, त्याचा टर्नओव्हर लाखो करोडोंमध्ये आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे कसलं ते दुर्देव! अभिनेता ऋतिक रोशनने ज्या चित्रपटांची ऑफर धुडकावली तेच ठरलेत सुपरहीट
हॅपी बर्थडे कल्की! अनुराग कश्यपसोबत ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडच्या मुलीला दिला जन्म, वाचा अभिनेत्रीबद्दल