कलाकार अनेकदा चित्रपटांची शूटिंग करताना विविध स्टंट्स करताना किंवा इतर कारणामुळे जखमी होतात. शूटिंग दरम्यान जखमी झालेल्या कलाकारांमध्ये अमिताभ बच्चन यांचे नाव नेहमीच वर राहील कारण ‘कुली’ सिनेमादरम्यान त्यांना झालेली जखम जीवघेणीच ठरली होती. सर्वच कलाकार त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कमी जास्त प्रमाणात जखमी होत असतात. नुकतीच अभिनेत्री नुसरत भरुचा देखील तिच्या एका सिनेमाच्या सेटवर जखमी झाली आहे.
आपल्या सुंदर लूकने आणि दमदार अभिनयाने सतत यश आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवणाऱ्या नुसरतचे जगभरात कोट्यवधी फॅन्स आहेत. ती बॉलिवूडमधील उत्तम अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. अनेक उत्तम सिनेमे दिलेली आणि लवकरच चांगल्या चित्रपटांमध्ये दिसणारी नुसरत तिच्या आगामी ‘छोरी २’ च्या सेटवर जखमी झाली. तिचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यात तिची सहकलाकार असलेली इशिता राज दिसत आहे, आणि ती नुसरत जखमी झाल्याबद्दल सांगते.
View this post on Instagram
सोशल मीडियावर सक्रिय असणारी नुसरत सतत तिच्या कामाची माहिती फॅन्सला देत असते. मात्र नुकतेच तिने तिच्या इंस्टा स्टोरीवर एक असा व्हिडिओ पोस्ट केला जो पाहून तिचे फॅन्स काहीसे टेन्शनमध्ये आले होते. या व्हिडिओमध्ये ती एका क्लिनिकमध्ये झोपलेली दिसत असून, तिच्या चेहऱ्यावर जखम झालेली दिसते आणि डॉक्टर त्यावर टाके घालत असतात. या व्हिडिओमध्ये तिला होणारा त्रास स्पष्ट दिसत होता. मात्र असे असूनही ‘छोरी २’ सिनेमाबद्दल आणि त्याच्या शुटिंगबद्दल तिची उत्सुकता अजिबात कमी झालेली दिसली नाही.
नुसरतची सहकलाकार असलेल्या इशिताने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “हे थोडे जास्त नाटक इंस्टाग्रामवरील फॉर्मॅलिटी साठी.” नुसरतच्या या व्हिडिओवर तिच्या फॅनसोबतच इंडस्ट्रीमधील लोकांनी तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे कसलं ते दुर्देव! अभिनेता ऋतिक रोशनने ज्या चित्रपटांची ऑफर धुडकावली तेच ठरलेत सुपरहीट
हॅपी बर्थडे कल्की! अनुराग कश्यपसोबत ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडच्या मुलीला दिला जन्म, वाचा अभिनेत्रीबद्दल