Friday, April 3, 2026
Home मराठी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम ‘या’ अभिनेत्याच्या घरी चिमुकलीचे आगमन, फोटो शेअर करत सांगितली आनंदाची बातमी

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम ‘या’ अभिनेत्याच्या घरी चिमुकलीचे आगमन, फोटो शेअर करत सांगितली आनंदाची बातमी

मागचं वर्ष अनेकर कालाकारांसाठी खास ठरलं आहे. काही जोडप्यांना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार लाभला तर काहीजन नवीन आई-बाबा झालेत. यामध्ये मराठीच नाही तर बॉलिवूड कलाकारही यामध्ये मागे नाहीत. नुकतंच अजुन एका अभिनत्याच्या घरी एका नवीन चिमुकलीचे आगमन झाले आहे. मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली‘ फेम हृषिकेश शेलार याच्या घरी आता एक नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे.

 

View this post on Instagram

 

मराठी कलर्सवारील लोकप्रिय मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली फेम’ (Sundara Manamadhe Bharli) अभिनेता हृषिकेश शेलार (Hrishikesh Shelar) पहिल्यांदा बाबा झाला आहे. त्याने त्याच्या पत्नीसह सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याशिवया त्याने त्याच्या पत्नीसह प्रग्नेंसी फोटोशूटही केलं होतं. हृषिकेश आता एका मुलीचा बाप झाला असून त्याने बाळाचा फोटो शेअर केला आहे. त्याने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “इट्स बेबी गर्ल , माझी जण फिलिंग बाप” त्याच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटमध्ये शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

अभिनेता हृषिकेश शेलार हा मालिकेमध्ये खलनायकाची भूमिका सकारत असून त्याची भूमिका प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरली आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयाने या भूमिकेला अजून जीव आनला आहे. हृषिकेशची पत्नी स्नेहा अशोक मंगल (Sneha Aashok Mangal) ही देखिल एक उत्तम कलाकार आहे तिने देखिल ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या लोकप्रिय मालिकेत काजल काटेची बहिण महणून भूमिका साकारली होती. सध्या दोघेही आपल्या आई-बाबा होण्याचा आनंद लुटत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
प्रत्येक गोष्टीत सौंदर्य असतं, पण साडीतील सौंदर्य हे अधिक आकर्षक असतं
कणभर तिळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा…

हे देखील वाचा