अमिताभ बच्चन हे एक लोकप्रिय कलाकार आहेत. त्यानी अनेक चित्रपटांमधुन प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. आणि त्याच्या मनात एक त्यांनी स्थान निर्माण केले आहेत. ते आता 83 वर्षाचे आहेत. तरीही ते दर रविवारी त्यांची एक झलक पाहण्यासाठी असंख्य चाहते त्यांच्या मुंबईतील घराबाहेर वाट पाहत असतात. सध्या, अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ या टीव्ही शोमध्ये सहभागी झाले आहेत. आणि याच दरम्यान शोच्या एका भागात, खुद्द अक्षय कुमारने बिग बींबद्दलचा एक रंजक किस्सा सांगितला आहे. आणि हा किस्सा त्याचा चाहता वर्ग असल्याचे दर्शन घडवतो.
अक्षय (Akshay)कुमार आणि सैफ अली खान हा ‘कौन बनेगा करोडपती’ च्या भागात त्याच्या आगामी चित्रपट हैवानच्या प्रमोशनसाठी आले होते. त्याच दरम्यान अक्षयने हा किस्सा शेअर केला आहे. अक्षयने अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित एक जुना प्रसंग आठवला. आणि तो म्हणला की, मुंबईतील लोखंडवाला भागात राहत असताना अमिताभ बच्चन यांनी त्याच्या घरी कशी भेट दिली होती, हा किस्सा त्याने सांगितला, तो पुढे म्हणाला एक घर काम करणारा त्यांचा खुप मोठा चाहता होता. जेव्हा त्याला अचानक मेगास्टारला भेटण्याची आणि त्याला पाणी द्यायची वेळ आली त्यावेळी तेव्हा तो इतका घाबरला आणि उत्साहित झाला की तो स्वत:ला आवरु शकला नाही.
अक्षय पुढे म्हणाला की, तो घरकाम करणारा व्यक्ती बच्चन यांच्यासाठी पाणी घेउन आला होता. ते सुमारे तीने चार ग्लास होते. आणि त्याला विश्वासच बसत नव्हाता की, तो द अमिताभ बच्चन याना पाणी देत आहे. तो मुळचा आलाहाबादचा होता. जेव्हा त्याच्या उत्साहात आणि घाबरण्यात, त्याच्या हातातून पाण्याचे सर्व ग्लास अमिताभ बच्चन यांच्या कुर्त्यावर सांडले, तेव्हा तो प्रसंग आणखीच मजेशीर झाला.
अक्षय आणि सैफ खान सध्या त्यांच्या आगामी चित्रपट हैवान यासाठी चर्चेत आहे. हा प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित आणि लिखित आहे. आणि हा चित्रपट 11 संप्टेबर 2026 रोजी चित्रपटगृहात रिलीज होत आहे.
हेही वाचा
बिग बॅास 20 मध्ये बादशाहची एक्स वाइफ ईशा रिखी भावुक, सलमान खानने दिला मुव्ह ऑन करण्याचा सल्ला










