इंडियन आयडॉल रिऍलिटी शो प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. दरवर्षी काही उत्तम गायक या शोमधून यशस्वी होतात. शोच्या आगामी एपिसोडमध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी पूनम सिन्हा या कार्यक्रमात दिसणार आहे. इंडियन आयडॉलच्या आगामी एपिसोडमध्ये या जोडप्याच्या आगमनावर लग्नाची थीम ठेवण्यात आली आहे. परंतु, या एपिसोडदरम्यान अभिनेता आणि त्याची पत्नी यांच्यात जोरदार भांडण होतं आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…
सोनी टीव्हीने आपल्या ट्विटरवर इंडियन आयडॉल शोच्या वेडिंग थीम एपिसोडचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शोचा सेट एखाद्या लग्नसोहळ्याप्रमाणे सजवण्यात आला आहे. शोचे जजसुद्धा एथनिक पोशाखात दिसत आहे. शो दरम्यान, सर्व स्पर्धक लग्नाशी संबंधित गाणी गाताना दिसत आहेत, तर काही स्पर्धक शत्रुघ्नच्या चित्रपटातील गाणी गाताना दिसत आहेत.
Iss baar #IndianIdol ke manch ko roshan karne aayenge iconic jodi Shantughan Sinha Ji & Poonam Sinha Ji!Aur Deboshmita karegi apne iss sureele performance se unko impress!Dekhiye inhe #IndianIdol13 ke #ShaadiSpecial mein! Sat-Sun raat 8 baje,sirf #SonyEntertainmentTelevision par! pic.twitter.com/nsWkfKNphN
— sonytv (@SonyTV) January 19, 2023
यादरम्यान, एका स्पर्धकाने शत्रुघ्न आणि रीना रॉयचे गाणं ‘जा रे जा ओ हरजाई देखी तेरी दिलदारी’ गायले, ज्यानंतर शत्रुघ्न यांनी रीना रॉयचे कौतुक केले. यानंतर शत्रुघ्नयांनी त्यांच्या पत्नीला पाहिले असता त्यांच्या लक्षात आले की, ती त्यांच्याच कडे पाहात आहे, तेव्हा शत्रुघ्न म्हणतात,’तू तिकडे बघ.’ ज्यावर पत्नी पूनम म्हणतात, ‘तू घरी चल.’ यावर तिथे उपस्थित असलेले सर्व स्पर्धक आणि जज हसायला लागतात. हा आगामी भाग प्रेक्षकांना या वीकेंडला पाहायला मिळणार आहे. इंडियन आयडॉलचा 12वा सीझन प्रेक्षकांमध्ये प्रचंड गाजला हाेता. या सीझनलाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांच्या अभिनय काराकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर त्यांनी ‘दाेस्ताना’, ‘नसीब’, ‘लाेहा’, ‘काल पत्थर’, ‘दाेस्त’, ‘हमसे ना टकराना’ यासारख्या दमदार चित्रपटात काम केले आहे. (bollywood actor shatrughan sinha praises reena roy his wife poonam gives hilarious reaction said tu ghar chal)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी अधिक मजबूत झाली’, म्हणत सरोगसीवरून ट्रोल करणाऱ्यांना प्रियांकाने दिले सणसणीत उत्तर
‘गरिबांची सनी लियोनी’, म्हणत नेटकऱ्यांनी केले सई ताम्हणकरला फोटोशूटवरून ट्रोल