‘माझी मुलगी इतकी गोरी आणि तू इतका काळा…’, म्हणत पूनमच्या आईने दिला होता शत्रुघ्न सिन्हांना लग्नासाठी नकार


आपल्या अभिनयाने तब्बल ४ दशकं गाजवणारे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक अविस्मरणीय चित्रपट दिले आहेत. यादरम्यान इतर अभिनेत्यांप्रमाणे त्यांचेही नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते. मात्र, ते पहिल्या नजरेत जिच्या प्रेमात पडले, ती अभिनेत्री इतर कोणी नसून पूनम चंदीरमानी आहे.

नुकतीच बॉलिवूडची ही सुंदर जोडी टीव्हीवरील प्रसिद्ध टीव्ही शो ‘इंडियन आयडल १२’मध्ये विशेष पाहुणे म्हणून गेली होती. यादरम्यान शत्रुघ्न यांनी सर्वांसोबत मजा- मस्ती केली. त्याचबरोबर त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासेही केले आहेत. (TV Show Indian Idol 12 Actor Shatrughan Sinha Was Rejected By His Mother In Law)

‘माझ्या सासूने दिला होता मला नकार’
या शोमध्ये पूनम यांच्याशी लग्न करण्याबाबतच्या अनेक गोष्टी शत्रुघ्न यांनी शेअर केल्या. त्यांनी सांगितले की, “पूनमला पाहताच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. त्यानंतर जेव्हा लग्नासाठी मी तिच्या आईची भेट घेतली, तेव्हा त्यांनी मला पाहताच नकार दिला होता. त्यांना असे वाटत होते की, मी त्यांच्या मुलीसाठी योग्य नाही. त्यामुळे त्यांना वाटत होते की, आम्ही लग्न करू नये.”

‘माझ्या सासूने मला म्हटले होते काळा’
“माझ्या सासूने मला पाहून म्हटले होते की, माझी मुलगी इतकी गोरी आहे आणि तू इतका काळा आहेस. जर तुम्हा दोघांना उभे करून कलर फोटो काढला तरीही ब्लॅक आणि व्हाईट इफेक्टच येईल,” असे पुढे बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले.

द कपिल शर्मा शोमध्ये ऐकवला होता किस्सा
यापूर्वी सन २०१९ मध्ये ‘द कपिल शर्मा शो’मध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी याबाबत बोलताना म्हटले होते की, “जेव्हा माझे मोठे बंधू राम सिन्हा आणि दिग्दर्शक एनएन सिप्पी माझ्या लग्नाबाबत बोलण्यासाठी पूनमच्या घरी गेले, तेव्हा तिची आई त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावत त्यांच्यावर नाराज झाल्या होत्या.”

या चित्रपटात झळकल्या होत्या पूनम सिन्हा
खरं तर शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी लग्न केल्यानंतर पूनम खूप काळ चित्रपटांपासून दूर राहिल्या होत्या. त्या शेवटच्या ‘जोधा अकबर’ चित्रपटात झळकल्या होत्या. त्यात त्यांनी ऋतिक रोशनच्या आईची भूमिका साकारली होती.

शत्रुघ्न सिन्हा यांच्याबाबत बोलायचं झालं, तर ते सध्या राजकारणात सक्रिय असून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.