Thursday, June 13, 2024

‘हिंदी न येणाऱ्याला बॉलिवूडमध्ये काम मिळतंय…’, शत्रुघ्न सिन्हांच्या मुलाची बॉलिवूडवर जहरी टीका

बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, जे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. काही जण देशातील घडामोडींवर वक्तव्य करतात, तर काही थेट बॉलिवूडवरही निशाणा साधताना दिसतात. असाच एक अभिनेता आहे, ज्याने थेट बॉलिवूडवर बोट ठेवले आहे. तो अभिनेता इतर कुणी नसून दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव्ह सिन्हा हा आहे. त्याने बॉलिवूडवर गंभीर आरोप करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

काय म्हणाला लव्ह सिन्हा?
अभिनेता लव्ह सिन्हा (Luv Sinha) याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्याची मते मांडली. त्याने म्हटले की, कशाप्रकारे बॉलिवूड मोठ्या प्रोजेक्टसाठी प्रतिभा नसणाऱ्या लोकांनाच घेत आहे. एक ट्वीट करत तो म्हणाला की, “मी माझ्या दुसऱ्या फिल्म इंडस्ट्रीबद्दल निश्चित नाहीये. मात्र, हिंदी सिनेमा अशा कलाकारांना संधी देतो, जे प्लॅस्टिक सर्जरी करतात, तितकेच प्लॅस्टिकचे असतात. ते हिंदी बोलू शकत नाहीत. अभिनय करू शकत नाहीत. मात्र, त्यांना प्रतिभावान सिने निर्मात्यांच्या मोठमोठ्या प्रोजेक्टमध्ये काम मिळणे सुरूच राहील.”

चाहत्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
अभिनेत्याने कुणाचेही नाव न घेता बॉलिवूड सिनेमे फ्लॉप होण्यावर टीकास्त्र डागले. तसेच, स्टार किड्सवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याच्या ट्वीटला प्रत्युत्तर देत एका युजरने लिहिले की, “मी खरंच अपेक्षा करतो की, 2023मध्ये आमच्यासारख्या लोकांना एक संधी आहे, ज्यांच्याकडे भाषेचे ज्ञान आणि प्रतिभेची जाण आहे. त्यांना हिंदी सिनेमात जास्त संधी मिळतील.”

एका युजरने अभिनेत्याला त्याचे वडील शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांच्या कारकीर्दीची आठवण करून दिली. तसेच, त्याने लिहिले की, “मुला, यामध्ये प्रयत्न करावे लागतात. आपल्या वडिलांकडे पाहा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Luv S Sinha (@luvsinha)

अभिनेत्याची कारकीर्द
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिचा भाऊ असलेल्या लव्ह सिन्हा याने 2010मध्ये ‘सदियां’ (Sadiyaan) या सिनेमातून पदार्पण केले होते. मात्र, तो यशस्वी होऊ शकला नाही. सिनेमा फ्लॉप झाला आणि त्याला यानंतर काम मिळालेच नाही. मात्र, आता लवकरच तो अनिल शर्मा यांच्या ‘गदर 2’ (Gadar 2) या सिनेमात झळकणार आहे. विशेष म्हणजे, त्याने राजकारणातही हात आजमावला आहे. (actor shatrughan sinha son luv sinha on bollywood know here)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ 5 दिग्गजांनी 2022मध्ये कायमची एक्झिट घेत चाहत्यांना केले पोरके, यादीत लता दीदींचाही समावेश
कुणाच्या चालण्यावर कमेंट, तर कुणाला म्हटले ‘गोल्ड डिगर’, पण कलाकारांनीही ट्रोलर्सला शिकवला चांगलाच धडा

हे देखील वाचा