Sunday, May 3, 2026
Home भोजपूरी ‘बाबूजी जरा धीरे चलना’वर रील बनवत मोनालिसाने दाखवला बोल्डनेसचा जलवा, पाहा भन्नाट व्हिडिओ

‘बाबूजी जरा धीरे चलना’वर रील बनवत मोनालिसाने दाखवला बोल्डनेसचा जलवा, पाहा भन्नाट व्हिडिओ

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा हिने इन्स्टाग्रामवर एक रील व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती ‘बाबूजी धीरे चलना’ या गाण्यावर ट्रांसफॉरमेशनल व्हिडिओ बनवताना दिसत आहे. मोनालिसाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर खूप पसंत केला जात आहे. याला 1 तासात 10 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर यावर 200हून  अधिक कमेंट्स आल्या आहेत.

व्हिडिओच्या सुरुवातीला मोनालिसा (monalisa) खिडकीजवळ उभी राहून बोल्ड पोज देताना दिसत आहे, ज्यामध्ये तिने जीन्स आणि फुल टी-शर्ट परिधान केला आहे. यासाेबतच तिने तिचे केस खुले साेडले आहेत आणि ती कॅमेऱ्याकडे बघत आहे. यानंतर ती हाताने कॅमेरा झाकते आणि कॅमेरावरुन हात काढताच मेकअपमध्ये दिसते. माेनालिसा मेकअपमध्ये सुंदर दिसत असून तिने ट्रेडिशनल पोशाख घातला आहे आणि यामध्ये ती वेगवेगळ्या पाेज देत चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

याआधीही अभिनेत्रीने पतीसाेबत शेअर केला व्हिडिओ
मोनालिसाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर चांगलाच पसंत केला जात आहे. अभिनेत्रीने याआधीही पतीसोबत एक व्हिडिओ शेअर होता, ज्यामध्ये ती आपल्या पतीला डायनला इंग्रजीत काय म्हणतात असे विचारताना दिसली हाेती. तिचा हा व्हिडीओही चाहत्याना खूप आवडला होता. तिच्या या व्हिडिओवर 11 हजारांहून अधिक लाईक्स मिळालेत.

मोनालिसा सोशल मीडियावर नियमित सक्रिय असते. ती कायमच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधते. चाहतेही तिचे नवीन फाेटाे पाहण्यास खूप उत्सुक असतात. माेनालिसाने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे. (bhojpuri actress monalisa bold reel video on song babuji zara dheere chalo fans reaction goes viral on instagram)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दिग्दर्शक अभिजित पानेसेंना शिंदे गटाकडून ऑफर? फिरणार का राजकारणाची सूत्र…

सुमन कल्याणपूर यांना मिळाले पद्मभूषण, वाचा लता मंगेशकरांशी तुलना होणाऱ्या या गायिकेचे किस्से

हे देखील वाचा