Sunday, June 22, 2025
Home मराठी ‘अजून खूप चालायचंय… नाही पाळायचंय…’ अमृता खानविलकरची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

‘अजून खूप चालायचंय… नाही पाळायचंय…’ अमृता खानविलकरची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृताने अभिनयासोबतच तिच्या डान्सने, सौंदर्याने आणि तिच्या फिटनेसने सर्वांनाच तिची दखल घ्यायला भाग पडले. मराठीमध्ये तर अमृता आघाडीची अभिनेत्री असून, तिने अनेक उत्तम मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदी मनोरंजनविश्वात मध्ये देखील अमृताने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अमृताने तिच्या आगामी वेबसिरीजची घोषणा केली. लवकरच अमृता ‘ललिता शिवाजी बाबर’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही वेब सीरिज धावपटू ललिता बाबर यांच्या जीवनावर आधारित आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अमृताने ही घोषणा केली आणि त्यानंतर तिच्या फॅन्ससोबतच सर्वच प्रेक्षकांमध्ये आनंदाची लहर निर्माण झाली. अमृताला एका वेगळ्या भूमिकेत बघणे ही सर्वांसाठीच एक पर्वणी असणार आहे. आता अमृताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ललिता बाबर यांचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिले आहे. अमृताने तिच्या पोस्टमध्ये म्हटले, “ललिता ताई ह्यांचा हा फोटो माझ्या साठी खूप खास आहे. २७ जानेवारीला सकाळ सन्मान २०२३ च्या माध्यमातून आम्हाला “ललिता शिवाजी बाबर ” ह्याची एक छोटीशी झलक… मा. मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे ह्यांना दाखवायला मिळाली. ज्या क्षणी ताईंना बोलण्यासाठी माइक दिला गेला, त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आम्हाला सगळ्यांनाच थक्क करून गेले… ताईंचा साधेपणा… त्यांचं बोलणं मनाला भिडलं… काही वाक्यांमधूनच कळत होतं की, त्या किती आतुरतेने ह्या दिवसाची वाट बघत होत्या. हा क्षण आम्हाला दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे यांचे मनापासून आभार प्रवास नुकताच सुरु झालाय…. अजून खूप चालायचंय… नाही पाळायचंय…”

अमृता सध्या या आगामी वेबसिरीजसाठी खूपच मेहनत घेत आहे. तिची ही सिरीज कधी प्रदर्शित होणार? यात अजून कोण कोण कलाकार असणार याबाबत अधिक माहिती समोर आली नसली तरी ही सिरीज गाजणार हे नक्की. तत्पूर्वी अमृताला मागच्यावर्षी प्रदर्शित झालेल्या आणि गाजलेल्या ‘चंद्रमुखी’ या सिनेमात पाहण्यात आले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पडद्यावरची पार्टनर ते आयुष्यभराची अर्धांगिनी, ‘अशी’ होती रमेश देव आणि सीमा देव यांची लव्हस्टोरी

सुकेशच्या आधी चाहत खन्नाचे नाव जाेडले गेले ‘या’ प्रसिद्ध गायकासोबत; 2 घटस्फाेटानंतर कुठे आहे अभिनेत्री?

 

हे देखील वाचा