Sunday, April 19, 2026
Home बॉलीवूड पार्टीतून बाहेर येताच पॅपराझींना पाहून लाजली जान्हवी; पाहा कोण व्यक्ती होता अभिनेत्रीसोबत

पार्टीतून बाहेर येताच पॅपराझींना पाहून लाजली जान्हवी; पाहा कोण व्यक्ती होता अभिनेत्रीसोबत

बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते. तिचे नाव अनेक स्टार्सशी जोडले गेले आहे. मात्र, जान्हवीने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक नात्यांबद्दल कधीही उघडपणे सांगितले नाही. अशातच आता, अभिनेत्री शिखर पहाडियासोबत त्याच्या कारमधून करण जोहरच्या घरातून बाहेर पडताना दिसली, ज्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे.

करण जोहर (karan johar) याने नुकतीच त्याच्या घरी एक पार्टी ठेवली होती, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सही सहभागी झाले होते. जान्हवी कपूरही या पार्टीत सहभागी होण्यासाठी पोहोचली होती, ज्याचा व्हिडिओ पॅपराझींने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना पॅपराझींने शिखर पहाडियाला जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड म्हटले आहे. आपल्या बॉयफ्रेंडसोबत कारमध्ये बसलेली जान्हवी ब्राऊन रंगाच्या मिनी ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिने या ड्रेससोबत बेज रंगाचा कोट घातला असून कानात हुप्स घातले होते. कारमध्ये ती शिखरसोबत संवाद साधताना दिसली. आपल्या फ्रेंडसोबत पार्टी करताना पापाराझींना नेहमी टाळणाऱ्या जान्हवी कपूरने यावेळी पॅपराझींनकडे दुर्लक्ष केले नाही. या ऐवजी अभिनेत्रीने पॅपराझींना हसून बाय केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूरच्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.  एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘जान्हवी लाजत आहे’. तर आणखी एका युजरने लिहिले की, ‘हा मुलगा थोडा सभ्य दिसत आहे’. मात्र, आणखी एका युजरने अभिनेत्रीची खिल्ली उडवत ‘जान्हवीला यापेक्षा चांगला आणि मिडिल क्लास बॉयफ्रेंड मिळू शकत नाही.’ असे लिहिले.

जान्हवी कपूरच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘धडक’, ‘मिली’, ‘बाॅम्बे 2’ यासारख्या दमदार चित्रपटात काम केले आहे. (bollywood actress janhvi kapoor spotted with rumored boyfriend shikhar pahariya in karan johar party photos goes viral on internet)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शूटिंगदरम्यान सनी लिओनला दुखापत, वेदना झाल्याने ढसाढस रडली अभिनेत्री

तब्बल पाच वर्षांनी दीपिका पदुकोणचा सिनेमा झाला हिट, भावनिक होत म्हटले शाहरुखला धन्यवाद

हे देखील वाचा