Monday, September 7, 2026
Home बॉलीवूड पत्नी सुनीताच्या आरोपांदरम्यान गोंविदाची देवाकडे प्रार्थना, आगामी चित्रपटांची घोषणा करत चाहत्यांकडे मागितली साथ

पत्नी सुनीताच्या आरोपांदरम्यान गोंविदाची देवाकडे प्रार्थना, आगामी चित्रपटांची घोषणा करत चाहत्यांकडे मागितली साथ

गोविंदा हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. तो अनेक उत्तम चित्रपटामुळे चर्चेत राहिला आहे. मात्र मागील काही महिन्यापासुन तो त्याच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहे. कोमल राणीसोबतच्या त्याच्या आगामी ‘रूपा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सुनीता आहुजाने गोविंदावर अनेक गंभीर आरोप केले असले तरी, अभिनेत्याने या प्रकरणी मौन बाळगले आहे. आणि तो त्याच्या आगामी चित्रपटावर लक्ष देत आहे. आणि या चित्रपटामुळे तो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर नुकतोच मुंबईतील युथ शक्ती दहीहंडी या कार्यक्रमाला उपस्थित होता या दरम्यान त्याने खुलासा केला की त्याचे लवकरच एक नाही तर एकुण दोन चित्रपट एकामागोमाग रीलीज होत आहेत. तसेच तो म्हणाला की, काही गोष्टी मी सुधारण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र त्याने कोणाचेही नाव नाही घेतले.

या कार्यक्रमानंतर अभिनेत्याने माध्यमाशी संवाद साधला, आणि या दरम्याने तो म्हणाला की, आजुन काही गोष्टी लिहुन ठेवल्या आहेत. आणि त्या गोष्टी स्वच्छ व्हव्यात मातृदेवतेकडे प्रार्थना करतो. या वेळी त्याने कोणाचे नाव नसले घेतले तरी हे विधान त्याच्या वैयक्तीक आयुष्यात घडण्याऱ्या घटण्याच्या वेळी त्याने केले आहे. काही दिवसांपुर्वी गोविंदाची (govinda)पत्नी, सुनीता आहुजाने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अलीकडेच, सुनीता राखी सावंतशी बोलत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये ती गोविंदावर दुसऱ्या लग्नाची तयारी करत असल्याचा आरोप करताना ऐकू येत होती.

या दरम्यान अभिनेत्याने आपल्या चाहत्यांकडुन पाठिंबाही मागितला आहे. दहिहंडीच्या कार्यक्रमादरम्यान जमलेल्या चाहत्याना तो म्हणाला की, मला तुमचे सहकार्य हवे आहे. इथे जसे तुम्ही मला पाठिंबा आणि सहकार्य केले आहे. तसेच पुढे ही पाहीजे आहे. आणि या दरम्यान तो म्हणाला की, मी रुपा मध्येच नाही तर दुनियादारी मध्येही दिसणार आहे.

हेही वाचा

पद्मावत चित्रपटावर केलेल्या टिप्पणीमुळे स्वरा भास्कर अडचणीत? आंदोलने उसळली, जीभ कापणाऱ्यासाठी बक्षीस जाहीर

 

हे देखील वाचा