Sunday, June 22, 2025
Home मराठी माणसातल्या खऱ्या माणुसकीचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेता संदीप पाठकचा ‘तो’ व्हिडिओ

माणसातल्या खऱ्या माणुसकीचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेता संदीप पाठकचा ‘तो’ व्हिडिओ

कलाकार हे नेहमीच गर्वात असतात, त्यांना त्यांच्या संपत्तीचा, त्यांच्या सेलिब्रिटी स्टेट्सचा गर्व असतो, असे आपल्याला नेहमीच वाटते. काही अंशी हे जरी खरे असले तरी सर्वच कलाकार असे असतातच असे नाही. मनोरंजनाविश्वात असे देखील अनेक कलाकार आहेत, जे फक्त दाखवण्यासाठी नाही तर खरोखरच जमिनीशी जोडलेले असतात. मराठीमध्ये तर अशा अनेक कलाकारांची नावे आपण घेऊ शकतो. यातलेच एक नाव म्हणजे अभिनेता संदीप पाठक. संदीप नेहमीच त्याच्यात असणाऱ्या एका उत्तम माणसाचे व्यक्तीचे दर्शन वेगवगेळ्या गोष्टींमधून प्रेक्षकांना घडवत असतो. मालिका, चित्रपट, नाटकं आदी सर्वच माध्यमांमध्ये रमणारा संदीप सोशल मीडियावरही चांगलंच सक्रिय आहे. तो सतत त्याचे विविधे व्हिडिओ, फोटो, अनुभव त्याच्या सोशल मीडिया कुटुंबासोबत शेअर करत असतो. असच एक व्हिडिओ त्याने पोस्ट केला आहे.

संदीपने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो प्रवास करत असताना अचानक त्याला एक आज्जी भेटल्या आणि त्याने त्यांना त्यांच्या गंतव्य ठिकाणापर्यंत सोडले. यादरम्यान त्यांच्यात काय चर्चा झाली. आज्जी काय म्हणाली हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. संदीप पाठक त्याच्या कारमधून शूटिंगला निघाला होता. तेव्हा वाटेत तो त्या आज्जी बघून थांबवतो आणि त्यांना विचारतो, ‘कुठे जायचं तुम्हाला?’ त्यावर आज्जी म्हणतात, ‘शेलू ला जायचं. एसटी रिकामी नाही’. हे ऐकून संदीप त्याच्या गाडीतून त्यांना शेलूला त्यांच्या गावापर्यंत सोडतो. गाडीतून उतरल्यावर संदीप म्हणतो, ‘मला आज असं वाटलं की गाडी घेतल्याचं चीज झालं आज.’ हे ऐकून आज्जी म्हणतात ‘मलाही वाटलं माझं लेकरुच…’ बोलता बोलता आज्जी मधेच थांबतात आणि रडू लागतात. यावर संदीप सांगतो, काही महिन्यांपूर्वीच आज्जींच्या मुलाचा अपघात झाला आहे. त्यांनी मला प्रवासात सांगितले. आता मलाच मुलगा समजा असं तो आज्जींना म्हणतो, काही खाणार का पाणी देऊ का अशी त्यांची विचारपूसही करतो. त्यांचे आशिर्वाद घेतो आणि निघतो.

संदीपचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “शुटींग ला जात असताना ही गोड आजी भेटली, प्रवासात तिच्यासोबत गप्पा झाल्या आणि आजीचे आशिर्वाद मिळाले. अजून काय हवं………” त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी त्याला शाबासकी दिली असून, खरा हिरो म्हटले आहे. संदीप नेहमीच त्याच्या प्रवासाचे व्हिडिओ शेअर करताना दिसतो.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
चुरा लिया है तुमने जो दिल को…! रवीना टंडनचा प्रमेता पाडणारा लूक, पाहाच फोटो
चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शकाचा अपमान करायचा सलमान खान? खुद्द कबीर खान यांनीच केला खुलासा

हे देखील वाचा