बॉलिवूडमध्ये सध्या जोरदार लग्नाचा सिझन चालू झाला आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल यानंतर आता अजून एक ग्लॅमरस जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगितले जात आहे. ही जोडी आहे अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी. मागील अनेक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चा इंडस्ट्रीमध्ये आणि मीडियामध्ये होताना दिसत आहे. मात्र या दोघांकडून अजून कोणत्याही प्रकारची माहिती अजून देण्यात आलेली नाही. असे असले तरी प्राप्त होणाऱ्या माहितीवरून त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली असून, ६ फेब्रुवारी रोजी सिद्धार्थ आणि कियारा लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याआधी ५ फेब्रुवारीपासून सुरु होणारे कार्यक्रम ८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत.
एका रिपोर्टनुसार सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्न करणार असून या लग्नासाठी १०० ते १२५ लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे. या लोकांमध्ये बॉलिवूडमधील कलाकारांसोबतच इतरही अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, करण जौहर, वरुण धवन आदी अनेक कलाकारांची नावे सामील आहेत. पाहुण्यांसाठी सूर्यगढ पॅलेसमध्ये अनेक आलिशान व्हिला बुक करण्यात आले आहे. सोबतच ८४ रुम देखील बुक केल्या आहेत. सोबतच पाहुण्यांना आणण्यासाठी आणि नेण्यासाठी ७० पेक्षा अधिक गाड्या बुक केल्या आहेत, ज्यांमध्ये मर्सिडीज-बेंज, जगुआर, BMW आदी गाड्यांचा समावेश आहे. या पॅलेसमधील लग्नस्थाही रोजचा १/२ कोटी खर्च असून, या लग्नासाठी मुंबईच्या एका मोठ्या वेडिंग प्लॅनर कंपनीला हायर केले गेले आहे.
सांगितले जात आहे की, कियारा आणि सिद्धार्थ यांची हळद आणि संगीत सेरेमनी लग्नाच्या दिवशीच होणार असून, अजून याबाबत अधिक महिती उपलब्ध झालेली नाही. सध्या सूर्यगढ पॅलेसमध्ये हळदीपासून संगीत, मेहेंदी, लग्न आदी कार्यक्रमांसाठी सेट डिझाइन करण्याचे काम चालू आहे. नुकतेच कियाराला मनीष मल्होत्रासोबत स्पॉट करण्यात आले होते. यावरून कदाचित ते तिच्या लग्नाच्या ड्रेससाठी भेटले असतील असे बोलले जात आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांचे लग्न पंजाबी पद्धतीनुसार होणार आहे. जैसलमेर येथे लग्न झाल्यानंतर ते मुंबईमध्ये एक ग्रँड रिसेप्शन देणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘हे तर काहीच नाय’ शोमध्ये प्रेक्षकांना रमेश देव यांना अनुभवायची मिळणार शेवटची संधी, निधनापूर्वी लावली होती शोमध्ये हजेरी
चित्रपटांपासून दूर असूनही बक्कळ पैसा कमावते शमिता शेट्टी; पण मिळवू शकली नाही बहीण शिल्पासारखं यश