Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड कष्टाचं चीज झालं! अक्षयपासून ते जॅकलिनपर्यंत बॉलिवूड कलाकार करायचे ‘हे’ काम, कोणी होतं कंडक्टर, तर कोणी टॅक्सी ड्रायव्हर

कष्टाचं चीज झालं! अक्षयपासून ते जॅकलिनपर्यंत बॉलिवूड कलाकार करायचे ‘हे’ काम, कोणी होतं कंडक्टर, तर कोणी टॅक्सी ड्रायव्हर

बऱ्याचदा आपण आपल्या करियरची दिशा निवडतो, त्याच दिशेने पाऊलाही टाकत पुढे जातं असतो, पण त्यात यश दरवेळी मिळतेच असे नसते.असे खुप जणांच्या बाबतीत होताना आपल्याला दिसते. या जगात कष्ट केल्याशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नाही, हे सगळ्यानाच ठाऊक आहे. या चंदेरी बॉलिवूड जगतात येण्यापूर्वी बरेच कलाकार असे पण आहेत, ज्यांना आपल्या करियरची दिशा नंतर सापडली, तर काही कलाकार त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात आपल्या घराला आधार म्हणून, त्यांनी साधी साधी कामेसुद्धा केली. परंतु त्यानंतर त्यांनी अखंड मेहनतीच्या जोरावर बॉलिवूड जगतात आपले नावं टिकवून ठेवत, भरपूर प्रसिद्धी मिळवली. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच काही कलाकारांबद्दल. चला तर मग सुरुवात करूया…

रजनीकांत
सुपरस्टार रजनीकांत यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर चित्रपट जगात स्वतःचे नाव मिळवले आहे. त्यांनी आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात कुली तसेच बस कंडक्टर म्हणून सुद्धा काम केले आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा आज बॉलिवूडचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. त्याच्या आयुष्यात दुःखाची अशी अनेक पर्वतं होती, ज्यांचा त्याने नाश करून यश मिळवले. दिल्लीत येण्यापूर्वी तो मेडिकलच्या दुकानात काम करायचा. यानंतर त्याने चौकीदार म्हणूनही काम केले. त्यानंतर त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली, आणि त्याने दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला.

आर. माधवन
दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आर माधवन अभिनय कारकिर्दीत येण्यापूर्वी सार्वजनिक भाषण कला, आणि व्यक्तिमत्त्व विकास कौशल्याचा कोर्सचे शिक्षण देत असे.

जॅकलिन फर्नांडिस
जॅकलिन फर्नांडिस ही बॉलिवूडमधील एक सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्री मानली जाते. चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी जॅकलिन श्रीलंकेत टीव्ही रिपोर्टर होती.

रणदीप हुड्डा
रणदीप हुड्डाने आयुष्यात खूप कष्टांना समोरा गेला आहे. अभिनेता होण्यापूर्वी तो वेटर, टॅक्सी ड्रायव्हर आणि कार वॉशर म्हणून काम करायचा.

अक्षय कुमार
बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार याच्या जीवन संघर्षाबद्दल सर्वांना माहिती आहे. बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी तो वेटर आणि शेफ म्हणून काम करायचा.

रणवीर सिंग
रणवीर सिंग आज बॉलिवूडच्या मोठ्या स्टारमध्ये सामील गणला जातो. त्याने बॉलिवूडमध्ये स्वतःच्या मेहनतीवर यश मिळवले. पण चित्रपटात येण्यापूर्वी रणवीर सिंग एका जाहिरात कंपनीत कॉपी रायटर म्हणून काम करायचा.

परिणीती चोप्रा
अभिनेत्री परिणीती चोप्रा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी, लंडनच्या एका फर्ममध्ये गुंतवणूकदार बँकर होती. यानंतर तिने ‘यश राज फिल्म’च्या जनसंपर्क संघात इंटर्न म्हणूनही काम केले आहे.

अर्शद वारसी
चित्रपटात येण्यापूर्वी अर्शद वारसी याने घरा-घरात जाऊन सौंदर्यप्रसाधनांची विक्री करायचे काम केले होते. आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी, त्याने फोटो लॅबमध्येही काम केले.

सन १९९३मध्ये ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटातून त्याने चित्रपट जगतात प्रवेश केला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लखलखत्या बॉलिवूड दुनियेत ‘हे’ कलाकार पडले मागे, आपल्या वडिलांप्रमाणे होऊ शकले नाहीत यशस्वी

-आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री होत्या सुचित्रा सेन, लग्नाच्या ५ वर्षांनंतर ठेवले होते सिनेमात पाऊल

-आयुष्यातील २० वर्षे ‘जम्पिंग जॅक’ जितेंद्र यांनी घालवली होती चाळीत, ५ वर्षांच्या संघर्षानंतर मिळाली होती चित्रपटात संधी

हे देखील वाचा