बॉलिवूडमधील बिग बी म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आपल्या दमदार अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये आणि चाहत्यांच्या मनामध्ये मोठं स्थान निर्माण केलं आहे. आज एक आदर्श आणि यशस्वी अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं. त्यांची दमदार स्टाइलचं तर तरुण पिढीलाही वेड लागलं आहे. बिग बींचे चाहते भारतातच नाही तर जगभरात पसरले अहेत. अशातच कोलकत्तामधील त्यांचे काही कट्टर चाहते आहेत ज्यांनी अमिताभजींना अभिनेताचं नाही तर देवाचं स्थान दिलं आहे.
‘शोले’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘बागबान’ आणि लोकप्रिय चित्रपट ‘सुर्यवंशम’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांतून अमिताभ बच्चन (Amitsbh Bacchan) यांनी प्रेक्षकांच्या मनात मोलाचं स्थान निर्माण केलं. त्याशिवाय त्यांचा अभिनय क्षेत्रामधील जीवनप्रवासही अनेक चाहत्यांच्या मनात घर करुन जाणारा आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी बीग बी एक प्रेरणा स्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. बिग बी अभिनयाशिवाय त्यांच्या कवितांसाठीही खूप प्रसिद्ध आहेत. कवीतांचा वारसा त्यांना त्यांच्या वडीलांकडूनच मिळाला होता. बीग बीचे वडील हरिवंशराय बच्चन हे हिंदी भाषेतील प्रसिद्ध कवी होते. त्यामुळे चाहत्यांप्रती अमिताभजींची तुफान क्रेज आहे. त्यांच्यासाठी चाहते काय करतील हे सांगणे उारच कठीण असते मात्र, एका ठिकाणी असं काही घडलं आहे ज्यामुळे चाहत्यांना वेडेपणाची हद्दच पार केली आहे.
कोलकत्तामधील आमिताभ बाच्चन प्रती तुफान क्रेज पाहायला मिळत आहे. मात्र त्यांची लोकप्रियता इथेच थांबत नाही तर कोलकत्ताच्या आनंदी नगरमध्ये चाहत्यांनी चक्क अमिताभजींच मंदिर बांधलं आहे. त्यांच्या मंदिराला बच्चन धाम असं नाव देण्यात आलं आहे. तुम्ही एकूण हैरण व्हाल की, इथे जसं देवाची आरती केली जाते त्याचप्रकारे त्यांच्या पुतळ्याची आरती केली जाते. अजून आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमिताभ चालीसादेखिल वाचली जातो.
सध्या सोशल मीडियावर या मंदिराचे आणि चाहते आरती करतानाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. त्याशिवाय काहींना त्यांना ट्रोल केलं आहे तर काहींनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी एका ऊंटावर चढून बसलो’ अमिताभ बच्चन यांनी सांगितला त्यांची खिल्ली उडवण्याचा किस्सा
सुंदर निसर्ग आणि गोड हसू! धनश्री काडगावकरचे समुद्रकिनाऱ्यावर फुललं सौंदर्य










