Thursday, December 26, 2024
[aioseo_breadcrumbs]

शत्रुघ्न सिन्हा यांना करियरच्या सुरुवातीला स्वतःमध्ये असणाऱ्या ‘या’ गोष्टीची वाटायची लाज, स्वतःच केला खुलासा

अभिनेता आणि दिग्दर्शक अरबाज खान सध्या विविध कारणांमुळे गाजत आहे. यातलेच एक कारण म्हणजे त्याचा नवीन शो. त्याने त्याचा ‘द इनविंसिबल्स’ नावाने एक चॅट शो सुरु केला आहे. या शोमध्ये विविध सेलेब्रिटी येतात आणि आणि त्याच्याशी विविध विषयांवर गप्पा मारतात. आतापर्यंत शोमध्ये सलीम खान, हेलन, वहिदा रहमान, जावेद अख्तर आदी दिग्गजांनी हजेरी लावली होती. आता या शोमध्ये अभिनेते शत्रुघ्न सिन्हा दिसणार आहे. शॉटगन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांनी या शोमध्ये अरबाज सोबत त्यांच्या करियरबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या.

शत्रुघ्न सिन्हा यांनी या शोमध्ये सांगितले की, त्यांना त्यांच्या दिसण्याचा मोठा न्यूनगंड होता. अरबाज खानच्या शोमध्ये त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरील जखमांच्या खुणांवरून काही गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की, “माझ्या चेहऱ्यावरील जखमांच्या खुणांमुळे मला खूपच लाज वाटायची. मी असा चेहरा घेऊन चित्रपटांमध्ये येत होतो. मी कशी या क्षेत्रात माझी जागा बनवेल याची मला खूप काळजी वाटायची. मी कसे काम करेल. मी प्लॅस्टिक सर्जनसोबत देखील चर्चा केली होती.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

अरबाज खानने पुढे शत्रुघ्न सिन्हा यांना विचारले की, बिहारमधील ते पहिले व्यक्ती होते, ज्यांनी एफटीआयमध्ये प्रवेश घेतला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “हा प्रश्न मला कधी कधी भावनिक देखील करतो. चिंतेचा विषय होता मीच होतो. वडिलांनी विचारले की हा अभिनय काय असतो? काय व्हायचे आहे? तुला जोकर बनायचे आहे. हे खूप कमी लोकांना माहित असेल की, वडिलांनी फॉर्मवर सही करायला देखील नकार दिला होता.”

याशिवाय शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या ‘काला पत्थर’ सिनेमाबद्दल देखील चर्चा केली. “खूप लोकांना वाटत होते की मी कला पत्थर करू नये. सलीम साहेब ज्यांना मी पंडित सलीम म्हणतो त्यांनी मला शपथ दिली आणि सांगितले की, तू हा सिनेमा सोडायचा नाही. काहीही कर आणि हा सिनेमा कर.हा सिनेमा तुझे आयुष्य बदलवणारा असेल.” पुढे त्यांनी हे देखील सांगितले की, सर्वात आधी स्वतःला सिद्ध करा. दरम्यान अभिनयात सक्रिय असणारे शत्रुघ्न सिन्हा राजकारणात देखील सक्रिय आहे. या भागाचा एक छोटा व्हिडिओ अरबाज खानने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रजनीकांत यांनी केली त्यांच्या १७० व्या चित्रपटाची घोषणा, टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित सिनेमात दिसणार थलाइवा

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान श्रद्धाबद्दल करण्यात आली नारेबाजी; चाहते म्हणाले, ’10 रुपयांची पेप्सी, श्रद्धा कपूर…’

हे देखील वाचा