Monday, May 13, 2024

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान श्रद्धाबद्दल करण्यात आली नारेबाजी; चाहते म्हणाले, ’10 रुपयांची पेप्सी, श्रद्धा कपूर…’

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर सध्या त्यांच्या आगामी ‘तू झुठी में मक्कर‘ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. दोन्ही कलाकार त्याच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडत नाहीत. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे रणबीर आणि श्रद्धा त्याचे जोरदार प्रमोशन करत आहेत. लव रंजन दिग्दर्शित या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अलीकडेच रणबीर आणि श्रद्धा अहमदाबादमध्ये गेले होते. तिथे असे काही घडले, जे ऐकून श्रद्धा लाजेने लाललाल झाली. काय घडलं प्रमोशनदरम्यान? चला तर मग जाणून घेऊया…

श्रद्धा कपूर (shraddha kapoor) ‘तू झूठी मैं मक्कर’च्या प्रमोशनसाठी गुजरातमधील अहमदाबाद येथील एका मॉलमध्ये पोहोचली होती. अभिनेत्रीच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते. या प्रमोशन इव्हेंटमध्ये लोकांनी श्रद्धा कपूरसाठी अशा घोषणा दिल्या की, अभिनेत्री लाजली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये श्रद्धा कपूर गुलाबी टॉप आणि ब्लू जीन्समध्ये स्टेजवर उभी असलेली दिसत आहे. अभिनेत्री स्टेजवर प्रवेश करताच, तिथे उपस्थित मुलींचा एक गट माईकवर म्हणाला, “10 रुपयांची पेप्सी, श्रद्धा कपूर सेक्सी.” मग काय तिथे उपस्थित असलेले सर्वजण पुन्हा पुन्हा एकाच आवाजात हे म्हणताना दिसले. अशा स्थितीत लोकांचे तिच्यावरील प्रेम पाहून अभिनेत्री लाजली अन् लाललाल झाली.

‘तू झुठी मैं मक्कर’ बद्दल बोलायचे झाले, तर रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनीत हा चित्रपट एक रोमँटिक ड्रामा आहे, जो 8 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित हाेईल. या चित्रपटातून रणबीर आणि श्रद्धा पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहे.(bollywood film tu jhoothi main makkaar crowd speak 10 rupaye ki pepsi shraddha kapoor sexy promote film in ahmedabad with actor ranbir)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एक्स गर्लफ्रेंड दिशा पटानीने टायगर श्रॉफच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट, ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाली…,’

मोठी बातमी! शाहरुख खानची पत्नी ‘गौरी खान’ यांची अडचण वाढणार….लखनऊमध्ये FIR दाखल, नेमक काय आहे प्रकरण?

हे देखील वाचा