Monday, May 13, 2024

रजनीकांत यांनी केली त्यांच्या 170 व्या चित्रपटाची घोषणा, टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित सिनेमात दिसणार थलाइवा

मनोरंजनविश्वातील सर्वात मोठा ब्रँड व्हॅल्यू असलेला अभिनेता कोण असा कोणी प्रश्न विचारला तर सर्वांच्या डोक्यात एकच नाव येईल आणि ते म्हणजे वन अँड ओन्ली रजनीकांत. या एका नावातच संपूर्ण मनोरंजनविश्व सामावल्यासारखे वाटते. बॉलिवूड असो किंवा साऊथ रजनीकांत यांच्या अभिनयाची आणि ऍक्शनची भुरळ कोणालाही पडल्याशिवाय राहत नाही. भलेही रजनीकांत यांनी हिंदीपेक्षा साऊथमध्ये जास्त काम केले, मात्र तरीही त्यांना सर्वच लोकांचे अपार प्रेम मिळाले. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र आता त्यांच्या ज्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. तो चित्रपट सर्वात खास आहे.

हो रजनीकांत यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा झाली असून, हा सिनेमा त्यांच्या करियरमधला १७० वा चित्रपट असणार आहे. लाइका प्रॉडक्शनने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून रजनीकांत यांच्या १७० व्या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन ‘जय भीम’ फेम टीजे ज्ञानवेल हे करणार असून, सध्या रजनीकांत त्यांच्या १६९ व्या चित्रपटात अर्थात ‘जेलर’मध्ये व्यस्त आहे.

रजनीकांत यांच्या या १७० व्या नवीन सिनेमाची घोषणा लाइका प्रोडक्शनचे चेयरमन असलेल्या सुभास्करण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आली आहे. या सिनेमाचे संगीत अनिरुद्ध रविचंदर बघणार असून, अजूनपर्यंत सिनेमाच्या नावाबद्दल कोणतीच माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. प्राप्त माहितीनुसार हा सिनेमा २०२४ साली प्रदर्शित होऊ शकतो असे सांगितले जात आहे.

लाइका प्रॉडक्शनने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आम्हाला सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत नवीन चित्रपटाची घोषणा करताना अतिशय आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की या सिनेमाला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळेल.” या ट्विटनंतर रजनीकांत यांच्या फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण असून, सतत या सिनेमाचाच चर्चा रंगताना दिसत आहे. सोशल मीडियावर देखील नेटकाऱ्यानी त्यांना त्यांच्या १७० व्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

तत्पूर्वी सध्या रजनीकांत त्यांच्या ‘जेलर’मध्ये व्यस्त असून, हा सिनेमा नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित करत आहे. जेलर २०२३ मध्ये प्रदर्शित होणार असला तरी अजून सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आलेली नाही. या सिनेमातून कन्नड सुपरस्टार शिवा राजकुमार तमिळमध्ये पदार्पण करणार आहे. तर अभिनेते मोहनलाल यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसतील. रजनीकांत यांच्यासोबत जेलरमध्ये योगी बाबू, त्रिशा कृष्णन, तमन्ना भाटिया, जैकी श्रॉफ, सुनील महतवाच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अमिताभ बच्चन यांच्यासोबत गाण्याची शूटिंग केल्यानंतर ‘या’ करण्यासाठी रात्रभर रडल्या होत्या स्मिता पाटील

‘मी खरंच माफी मागतो’ देवमाणूस फेम एकनाथ गीते यांची ‘ती’ पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा