Wednesday, January 15, 2025
Home बॉलीवूड एकीकडे संपत्तीचे वाद सुरु असताना दुसरीकडे नवाजुद्दीन सिद्दीकीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

एकीकडे संपत्तीचे वाद सुरु असताना दुसरीकडे नवाजुद्दीन सिद्दीकीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मागील अनेक दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्धीकी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच गाजत आहे. त्याचे वैयक्तिक आयुष्य सध्या लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. नवाजुद्दीनच्या बायकोने आलियाने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप लावले असून यात तिने तिच्यासोबत गैरवर्तन करणे, घरात डांबून ठेवणे, उपाशी ठेवणे आदी अनेक आरोपांचा समावेश केला आहे. तर नवाजच्या भावाने देखील त्याच्या विरोधात अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे नवाजुद्दीनच्या समस्या कमी होण्यापेक्षा वाढतानाच दिसत आहे. या सर्व गोष्टींमध्ये त्याने एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.

नावाजवर काही दिवसांपासून अनेक मोठे आणि गंभीर आरोप होते आहे. यावर अजून नावाजने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र या आरोप प्रत्यारोपांमध्ये त्याने एक निर्णय घेतला आहे. नावाजने त्याच्या उत्तरप्रदेशमधील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील त्याचे गाव असणाऱ्या बुधाना येथील जमीन भावांच्या नावावर केली आहे. त्याच्या या निर्णयामुळे सर्वानाच आश्चर्य वाटत आहे.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी नुकताच जिल्ह्यातील रजिस्टर ऑफिसमध्ये गेला होता. जिथे त्याचा भाऊ असलेला अलमासुद्दीन सिद्दीकी त्याचे वकील प्रशांत शर्मा यांच्यासोबत आधीच उपस्थित होता. नावाजने सबरजिस्टर समोर कागदपत्रांवर सही करत त्याच्या हिस्स्याची घराण्याची संपत्ती एका भावाच्या नावे केली आहे. तर संपत्तीचे मृत्यूपत्र देखील तिघे भावांच्या नावे केले आहे.

दरम्यान नावाजने मुंबई येथे त्याच्या आजारी आईची भेट घेण्यासाठी भावाचे घर गाठले असता त्याच्या भावांनी त्याला घरात देखील घेतले नाही. आजारी असलेल्या आईला बघण्यासाठी नवाजुद्दीन भाऊ राहत असलेल्या वर्सोवा येथील बंगल्यावर गेला होता. पण त्याचा भाऊ फैजुद्दीनने त्याला घरात घेतले नाही. बंगल्याच्या गेटवरुनच नवाजला त्याने परत पाठवले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रजनीकांत यांनी केली त्यांच्या १७० व्या चित्रपटाची घोषणा, टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित सिनेमात दिसणार थलाइवा

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान श्रद्धाबद्दल करण्यात आली नारेबाजी; चाहते म्हणाले, ’10 रुपयांची पेप्सी, श्रद्धा कपूर…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा