२०२० वर्षात कोरोनामुळे अनेक लग्न पुढे ढकलल्या गेले. मात्र आता जसजशी कोरोनाची तीव्रता कमी होत आहे तसतसे अनेक अनेक कार्यक्रम आणि लग्न होण्यास सुरुवात झाली आहे. बॉलीवूडमध्ये देखील आता लग्नाचा सिझन सुरु झाला आहे. मागील काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये अनेक जोड्या बंधनात अडकल्या आहेत.
यात आता एका जोडीची भर पडत आहे. बॉलीवूड मधील लेखक जोडी म्हणजे, कनिका ढिल्लन आणि हिमांशू शर्मा.
नुकताच कनिका आणि हिमांशू यांनी साखरपुडा केला आहे. लेखक असलेल्या या जोडी अगदी जवळच्या नातेवाईकांमध्ये खाजगी कार्यक्रम करत हा साखरपुडा केला. हिमांशू आणि कनिकाने नोव्हेंबर महिन्यात हा साखरपुडा केला असून कनिकाने ही माहिती तिच्या इंस्टाग्राम पोस्ट वरून दिली.
कनिकाने #Famjam and more .. with #himanshusharma ❤️… लिहीत तिच्या साखरपुड्याचे काही फोटो शेयर केले. ती आणि हिमांशू फोटोत खूप आनंदी दिसत आहे. यावेळी कनिकाने पिवळ्या रंगाचा ड्रेस तर हिमांशूने निळ्या रंगाचा कुर्ता, पांढरे जॅकेट आणि पायजमा घातला होता.
Famjam and more with #Himanshusharma ❤️ thank u for the wishes.. pic.twitter.com/kG1uDqvWpR
— Kanika Dhillon (@KanikaDhillon) December 14, 2020
हे दोघे एक वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. कनिकाचे याआधी फिल्ममेकर प्रकाश कोवलामुडी सोबत लग्न झाले होते. मात्र काही कारणांमुळे त्यांनी २०१९ मध्ये घटस्फोट घेतला. तर हिमांशू अभिनेत्री स्वरा भास्कर सोबत रिलेशनशिप मध्ये होता. त्यांच्याही नात्यात काही कारणामुळे कटुता आली आणि ते विभक्त झाले.
हिमांशूने आतापर्यंत बॉलीवूडमध्ये ‘तनु वेड्स मनू’, ‘तनु वेड्स मनू रिटर्न’ आणि ‘रांझणा’ सारखे हिट चित्रपट लिहले आहेत. तर कनिकाने ‘मनमर्जिया’, ‘केदारनाथ’, ‘जजमेंटल है क्या’, ‘गिल्टी’ यांसारखे सुपर हिट सिनेमे लिहले आहेत.
लवकरच कनिकाचा तपासू पन्नू अभिनित ‘हसीन दिलरुबा’ नावाचा सिनेमा येणार आहे. कनिकाने तिच्या लिखाणाच्या प्रवासाची सुरुवात शाहरुख खानच्या रेड चिली इंटरटेन्मेन्ट मध्ये स्क्रिप्ट सुपरवायझर म्हणून केली. तर हिमांशूने त्याच्या लिखाणाची सुरुवात टीव्ही मालिकांपासून केली. हिमांशूला ‘तनु वेड्स मनू’ आणि ‘तनु वेड्स मनू रिटर्न’ या दोन्ही चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.