सलमान खानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान‘ या चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात आता या चित्रपटाचे नवीन गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात सलमान खान आणि पूजा हेगडे यांची लव्हस्टाेरी दाखवण्यात आली आहे. ‘फॉलिंग इन लव्ह’मध्ये दोघांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. या गाण्यात भाईजान एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे, जो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
सलमान खान (salman khan) याने त्याच्या इंस्टाग्रामवर ‘फॉलिंग इन लव्ह’चा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यावर चाहते भिन्नभिन्न कमेंट करत प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
View this post on Instagram
‘किसी का भाई किसी की जान’ची रिलीज डेट आतापर्यंत अनेकदा बदलण्यात आली आहे. 2022 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी चाहत्यांची अपेक्षा होती, परंतु निर्मितीचे काम पूर्ण न झाल्यामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. नवीन रिलीज डेटनुसार हा चित्रपट यावर्षी म्हणजेच ईदच्या मुहूर्तावर सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे. आपल्या प्रियजनांना गिफ्ट देण्यासाठी सलमान खान 21 एप्रिलला ‘किसी का भाई किसी की जान’ रिलीज करत आहे.
‘किसी का भाई किसी की जान’च्या स्टार कास्टबद्दल बोलायचे झाले, तर सलमान खान आणि पूजा हेगडे व्यतिरिक्त या चित्रपटात शहनाज गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल आणि राघव जुयाल यांचाही समावेश आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे, तर साजिद नाडियादवाला यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.(kisi ka bhai kisi ki jaan song falling in love released bollywood actor salman khan and actress pooja hegde refreshing chemistry will steal your heart)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी माझी पहिली सेलिब्रिटी सही घेतली’ अभिनेता ऋतुराज फडकेने सुनील बर्वेबद्दल शेअर केली खास पोस्ट
धक्कादायक! ‘मै नही तो कौन बे’ फेम सृष्टी तावडेचा लहान असताना मोलकरणीने केला होता शारीरिक छळ