‘खतरों के खिलाड़ी 12’ l अभिनेत्रीचा खतरनाक स्टंट पाहून पूजा हेगडेची उडाली भितीने गाळण, व्हिडिओ व्हायरल

0
79
pooja hegde
Photo Courtesy : Instagram/ Colors tv

खतरों के खिलाडी 12‘ हा टीव्ही रिऍलिटी शो गेल्या काही आठवड्यांपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. एका दमदार प्रवासानंतर, आता शो संपणार आहे. रविवारी या शोला त्याचा विजेता देखील मिळेल. खतरों के खिलाडी 12 चा ग्रँड फिनाले 25 सप्टेंबर रोजी होणार आहे, जिथे ‘सर्कस‘ चित्रपटाचे स्टार्स रणवीर सिंग आणि अभिनेत्री पूजा हेगडे देखील पोहोचले होते. फिनालेमधील स्पर्धकांचे धोकादायक स्टंट पाहून त्यांनाही चांगलाच धक्का बसला.

‘खतरों के खिलाडी 12’ (Khatron Ke Khiladi 12) च्या ग्रँड फिनालेमध्ये, शोच्या सुरुवातीशी संबंधित सर्व सेलिब्रिटींनी हजेरी लावली आणि काहींनी परफॉर्म देखील केले. यामध्ये टीव्हीची लोकप्रिय सून सृती झा(Sriti Jha) हिचा समावेश आहे. शोमधून तिचा एक प्रोमो व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये सृती अंतिम फेरीत ड्रॅगन स्टाफचे उत्कृष्ट कौशल्य दाखवताना दिसत आहे. सृती स्टेजवर रॉड घेऊन चालत आहे, ज्यातून दोन्ही बाजूंनी आग निघत आहे.

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

सृती झा हिने या रॉडचा याेग्य समतोल राखत, बाॅडी जवळून आगिचा रॉड फिरवत उत्तम परफार्म केला आहे. हा पराक्रम पाहून अभिनेत्री पूजा हेगडेही स्तब्ध झाली आणि काही वेळ ती श्रृतीकडे आश्चर्याने पाहत राहिली.

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

‘खतरों के खिलाडी सीझन 12’ मध्ये, सर्व स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी केली, परंतु केवळ सर्वोत्तम खेळाडूंनाच टॉप 5 मध्ये सामील होण्याची संधी मिळाली. यामध्ये रुबिना दिलीक, तुषार कालिया, जन्नत जुबेर, फैजल शेख आणि मोहित मलिक यांच्या समावेश आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, तुषार कालियाने या सीझनमध्ये विजेतेपद पटकावले आहे. मात्र,हे कितपत खरं हे आता काही तासात कळेल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
श्रेयाकडे आहेत तब्बल ‘एवढ्या’ चपलांचे जोड; आकडा वाचून तुम्हीही म्हणाल, ‘दुकानच टाकूया की मग’
‘या’ गुरूंच्या सांगण्यावरून ऐश्वर्या बनली बच्चन कुटुंबाची सून! पाहा बॉलिवूड कलाकारांचे अध्यात्मिक गुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here