Thursday, March 28, 2024

किसी का भाई किसी की जान सिनेमातील ‘नय्यो लगदा’ गाणे प्रदर्शित, सलमान आणि पूजाच्या रोमॅंटिक केमिस्ट्रीने वेधले लक्ष

मागील बरेच दिवसापासून सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाची चर्चा होती. पठाण सिनेमासोबत प्रदर्शित झालेला टिझर पाहून ही उत्सुकता अधिकच वाढली. सिनेमा जरी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत असला तरी सिनेमातील पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. व्हॅलेंटाइन डे लवकरच येत असून, याच पार्श्वभूमीवर सिनेमातील सलमान आणि पूजा यांच्यावर चित्रित झालेले रोमॅंटिक गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

नुकतेच प्रदर्शित झालेल्या या गाण्याचे नाव आहे ‘नय्यो लगदा’. गाण्यात सलमान खान आणि पूजा हेडगे यांचा रोमॅंटिक अंदाज दिसत असून, अतिशय सुंदर आणि श्रवणीय असे हे गाणे आहे. या गाण्याला गायिका पलक मुच्छल आणि गायक कमाल खान यांनी त्यांच्या श्रवणीय आवाजात गायले असून, हिमेश रेशमियाने गाण्याला संगीतबद्ध केले आहे. याआधी देखील सलमान खानच्या अनेक चित्रपटांना हिमेशने हिट संगीत दिले आहे. हे गाणे प्रदर्शित होताच गाजायला सुरुवात झाली आहे. गाणे प्रदर्शित झालायनंतर काही तासांच्या आतच गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहे. या गाण्यामध्ये सलमान खानचा हटके लूक लाइमलाइट मिळवत आहे. गाण्यात सलमान खान लांब केसांमध्ये रफ अँड टफ लूकमध्ये दिसत आहे. तर पूजा नेहमीप्रमाणे आकर्षक आणि सुंदर दिसत आहे. हे गाणे यूट्यूब सोबतच सोशल मेडियावरही गाजत असून सध्या ते ट्रेंडिंगमध्ये आले आहे.

सलमान खान या सिनेमाच्या माध्यमातून काही वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. त्याने ‘अंतिम सिनेमात एक छोटी भूमिका केली होती. यात अभिनेता आयुष शर्मा मुख्य भूमिकेत होता. तर पठाण सिनेमात सलमान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होता. या सिनेमाकडून सलमानसोबतच त्याच्या फॅन्सला आणि बॉक्स ऑफिसला मोठ्या अशा आहेत. आता यासर्वावर सलमान आणि त्याचा सिनेमा खरा ठरतो का ते पाहणे महत्वाचे असेल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट ‘या’ तारखेला हाेणार प्रदर्शित

राजकुमार हिरानी बनवणार लाला अमरनाथांचा बायाेपिक, ‘खिलाडी’ अक्षय दिसणार मुख्य भूमिकेत?

हे देखील वाचा