Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

भयानक अपघाताचा शिकार झाल्या होत्या मीना कुमारी, तर ‘यामुळे’ ओढणीने लपवायच्या आपला डावा हात

मीना कुमारी या गोल्डन एरामधील सुपरहिट अभिनेत्रींपैकी एक होत्या. चित्रपटांमध्ये त्या त्यांची व्यक्तिरेखा इतक्या गंभीर पद्धतीने साकारायच्या, की ती अक्षरशः खरी वाटायची. कदाचित यामुळेच त्या ट्रॅजेडी क्वीन बनल्या. पण त्यांचे खरे आयुष्य दुःखाने भरलेले होते. त्यांच्या सौंदर्याने आणि चमकदार अभिनयाने त्यांनी चित्रपटसृष्टीत एक स्थान निर्माण केले. पण त्यांचे वैयक्तिक जीवन दारू आणि तंबाखूच्या नशेत वाया जात होते. मीना कुमारी अनेकदा त्यांच्या चित्रपटांमध्ये आपला डावा हात लपवून ठेवत. गाणे असो वा सीन, ती त्यांच्या साडीने किंवा ओढणीने हा हात लपवत असायच्या.  

पण मीना कुमारी (Meena Kumari) आपला डावा हात चित्रपटांमध्ये का लपवायच्या? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. याचे कारण होते कार अपघात. खरे तर मीना कुमारी एकदा महाबळेश्वरहून कारने मुंबईच्या दिशेने परतत असताना, वाटेत त्यांच्या कारचा अपघात झाला. त्यांना अनेक दिवस रुग्णालयात दाखल करावे लागले. या अपघातात त्यांच्या डाव्या हाताला खूप दुखापत झाली होती, त्यामुळे हाताच्या एका बोटाचा आकार विकृत झाला होता. ही कमतरता त्यांना पडद्यावर दाखवायची नव्हती, म्हणून त्या शूटिंग करताना बहुतेकदा आपला डावा हात लपवत. प्रसिद्ध गीतकार कमाल अमरोही यांचा मुलगा ताजदार अमरोही यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. (tragedy queen meena kumari always hide hand from dupatta after car accident)

घटस्फोटानंतर व्यसनात बुडाली अभिनेत्री
वास्तविक कमल अमरोही यांनी विवाहित असूनही मीना कुमारी यांच्याशी दुसरे लग्न केले होते. पण जेव्हा या लग्नाचा खुलासा झाला, तेव्हा त्यांच्या पहिल्या पत्नीला हे सहन झाले नाही. त्यानंतर कमल अमरोहीने मीना कुमारीला घटस्फोट दिला. यानंतर मीना कुमारी यांचे आयुष्य दु:खाच्या अंधारात गेले. या दु:खातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी दारूचा आधार घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्या कधीच नशेच्या दलदलीतून बाहेर पडू शकल्या नाहीत.

अधिक वाचा- 
‘त्या’ प्रसंगानंतर शूटवरून घरी आल्यावर ढसाढसा रडली होती मृणाल ठाकूर, ‘अशी’ केली बॉलिवूडमध्ये एंट्री
सॉफ्टवेअर इंजिनिअर, मिस इंडिया अन् आज बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री; वाचा तापसी पन्नूचा रोचक सिनेप्रवास

हे देखील वाचा