प्रसिद्ध रॅपर-गायक बादशाहची गाणी क्लबपासून ते विवाहसोहळ्यापर्यंत आकर्षण ठरतात. बादशाहच्या तालावर स्टार्सही नाचताना दिसतात. अशातच आता रॅपर लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, बादशाहला त्याच्या आयुष्यातील खरे प्रेम सापडले आहे आणि लवकरच तो त्याच्या लेडी लवशी लग्न करणार आहे.
बादशाह (badshah) अनेक दिवसांपासून अभिनेत्री ईशा रिखीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अशात असे सांगितले जात आहे की, हे कपल एकमेकांबाबत खूप सिरिअस आहे आणि लवकरच लग्न करणार आहे. एवढेच नाही, तर या महिन्यात लग्न केल्यानंतर दोघे अधिकृतपणे एकमेकांसोबत कायमचे राहणार असल्याचीही बातमी आहे.
बादशाहसोबत काम केलेल्या म्युझिक लेबलच्या कर्मचाऱ्यानेही या चर्चेला पुष्टी दिली आहे. महत्वाचे म्हणजे बादशाहा-ईशा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या गेल्या वर्षी इंटरनेटवर गाजल्या होत्या. मात्र, या जोडप्याने या बातम्यांना ना खरे म्हटले ना नाकारले. या वृत्तांवर दोघांनीही आतापर्यंत मौन बाळगले आहे.
View this post on Instagram
बादशाह नुकताच मुंबईत दिसला हाेता. यादरम्यान असा दावा केला जात आहे की ,त्याने लग्नाची खरेदी सुरू केली आहे. माध्यमातील वृत्तांनुसार, बादशाहच्या लग्नाबद्दल फक्त त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांनाच माहिती आहे. मात्र, ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. रॅपरचे चाहते त्याला लग्नाच्या ड्रेसमध्ये पाहण्यासाठी खुप उत्सुक आहेत.
View this post on Instagram
मंडळी, बादशाहचे हे दुसरे लग्न आहे. गायकाने पहिले लग्न जस्मिन मसिहशी केले, जिच्यासाेबत त्याला एक मुलगी आहे, मुलीचे नाव जेसामी ग्रेस मसिह सिंग आहे, जिचा जन्म 2017 मध्ये झाला. मात्र, 2020मध्ये गायक त्याच्या पत्नीपासून वेगळा झाला. अशात आजपर्यंत त्यांच्या विभक्त होण्याचे कारण समोर आलेले नाही.(bollywood rapper badshah is going to tie the knot with actress isha rikhi this month know wedding update)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सलमान खानचा शाहरुखच्या बायकाेसाेबतचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल; चाहते म्हणाले, ‘सल्लू भाई…’
अंबानी कुटुंबीयांच्या कार्यक्रमात बाॅलिवूडच्या ‘या’ दिग्गज कलाकरांनी लावली हजेरी, रेखा यांनी नीता अंबानीसोबत दिली पाेज