Tuesday, March 5, 2024

अंबानी कुटुंबीयांच्या कार्यक्रमात बाॅलिवूडकरांची हजेरी, रेखा आणि नीता अंबानींचा हा फोटो होतोय व्हायरल

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा उद्घाटन सोहळा दोन दिवस मुंबईत चालला. या साेहळ्यात हॉलिवूड आणि बॉलीवूड सेलिब्रिटींनी रेड कार्पेटवर आपली फॅशन आणि सौंदर्य दाखवले. या कार्यक्रमात सलमान खान, रेखा, जान्हवी कपूर, दिशा पटनी, श्रद्धा कपूर, गौरी खान, प्रियांका चोप्रा, आर्यन खानपासून बॉलिवूडचे सर्व स्टार्स पोहोचले. यादरम्यान प्रत्येकजण एकापेक्षा एक फॅशन लुकमध्ये दिसले, ज्याचे व्हिडिओ सध्या साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे.

शुक्रवारी (31 मार्च)ला बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरीसोबत भारतात परतली. भारतात परतल्यानंतर अभिनेत्रीने अंबानी कुटुंबाच्या उद्घाटन साेहळ्यालाही हजेरी लावली होती. पहिल्याच दिवशी नव्हे तर, दुस-या दिवशीही अभिनेत्रीने तिच्या एंट्रीने आणि लूकने चाहत्यांची मने जिंकली. प्रियांकाने यावेळी मल्टी कलरचा थाई हाय लिस्ट गाऊन परिधान केला होता. हा ड्रेस मनीष मल्होत्राने डिझाइन केला होता, ज्यामध्ये प्रियांकाने चार चांद लावले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अंबानी कुटुंबाच्या या कार्यक्रमात शाहरुख खानची पत्नी गौरी खान पांढऱ्या रंगाच्या सुंदर साडीत दिसली. यादरम्यान तिची ग्लॅमरस स्टाइल पाहण्यासारखी हाेती, ज्याने चाहते वेडे झालेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेही गोल्डन लेहेंग्यात सुंदर दिसत हाेती, जिच्या व्हिडिवर चाहते भन्नाट कमेटं करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अंबानी कल्चरल सेंटरच्या कार्यक्रमात जान्हवी कपूर दुसऱ्या दिवशी मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या पोशाखात दिसली, ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत हाेती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी अभिनेत्री काजोल तिची मुलगी न्यासा देवगणसोबत पोहोचली. यादरम्यान आई आणि मुलगी दोघींनी पापाराझींसमोर पोज दिल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या आलिशान कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री रेखाने नीता अंबानीसोबत रेड कार्पेटवर पोज दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अशाप्रकारे कलाकरांचे हे व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत असून चाहते यावर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (bollywood `stars nmacc launch day 2 bollywood celebs arrive video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नाटू- नाटू’ गाण्यावर बाॅलिवूसह टाॅलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने लावले ठूमके, तर पठाणने दिली आयकॉनिक पोज

अय्याे! सर्वांनसमाेर वरुण धवनने हाॅलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला केले ‘किस’, एकदा व्हिडिओ पाहाच

हे देखील वाचा