बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेता म्हणून मनोज बाजपेयी ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांसोबतच समीक्षकांची मने देखील जिंकली. मुख्य अभिनेत्यासोबतच त्यांनी चरित्र भूमिका देखील साकारल्या आहेत. चित्रपटांसोबतच ओटीटी माध्यमावर देखील ती यशस्वी ठरले. सत्या, अक्स, अलीगढ़ अशा उत्तम चित्रपटांमधून त्यांनी त्यांचा प्रभावी अभिनय लोकांसमोर दाखवला. नुकताच त्यांचा ‘गुलमोहर’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी राम गोपाल वर्मा यांच्यामुळेच त्यांचे करियर घडले असल्याचे सांगितले.
मनोज यांनी वर्मा यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. राम गोपाल वर्मा यांच्या अनेक चित्रपटांमध्ये मनोज बाजपेयी यांनी काम केले आहे. या दोघांनी सत्या, कौन, शूल आदी अनेक हिट सिनेमे दिले. यातल्याच ‘सत्या’ सिनेमासाठी मनोज यांना सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. राम गोपाल वर्मा यांच्या मुळेच त्यांच्या करियरला वेग मिळाल्याचे देखील मनोज यांनी सांगितले. आजही ते दोघं संपर्कात आहे. तसे त्यांचे बोलणे कमी होते, मात्र वर्मा हे फक्त मनोज यांना शिव्या द्यायलाच फोन करत असल्याचे मनोज बाजपेयी यांनी सांगितले.
नुकतेच मनोज यांच्या ‘सपने में मिलती है’ या गाण्याचा रिमेक बनवला गेला आहे. या गाण्यात मनोज यांनी कॅमिओ देखील केला. याबद्दल बोलताना त्यांनी हसून सांगितले की, कधी कधी मित्रांसाठी असे काही करावे लागते. ऑस्कर विजेत्या एमएम कीरावनी यांनी देखील त्यांना या क्षेत्रात ब्रेक देण्याचे श्रेय राम गोपाल वर्मा यांनाच दिले. आरजीवी यांनी त्यांना त्यांच्या ‘क्षण क्षणम’ या सिनेमात संधी दिली होती.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मग जा पाकिस्तानला’ म्हणत अभिनेत्री स्वरा भास्करच्या ‘त्या’ ट्विटला नेटकऱ्यांचे सणसणीत उत्तर
राम चरण अन् व्यंकटेशसोबत सलमान नाचला लुंगी डान्सवर; चाहते म्हणाले,’साँग ऑफ द इयर’