अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) हिने अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात तिची एक हक्काची जागा निर्माण केलेली आहे. प्रियाने मराठी सोबत हिंदी सिनेसृष्टीत देखील काम केलेले आहे. त्याचप्रमाणे तिने अनेक वेबसिरीजमध्ये देखील काम केलेले आहे. प्रिया बापटचा मुख्य भूमिकेत असलेला विस्फोट हा हिंदी सिनेमा ओटीटीवर रिलीज देखील झालेला आहे. या चित्रपटात तिच्या सोबत अनेक हिंदी कलाकार आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये रितेश देशमुख फरदीन हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. नुकतेच प्रियाने एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीत घेऊन या सिनेमातील कामाबद्दल सांगितले. तसेच अभिनेत्रीने रितेश देशमुखचे भरभरून कौतुक केलेले आहे.
यावेळी मुलाखतीमध्ये प्रिया म्हणाली की, “रितेश देशमुख फारच कमाल आहे. कामाच्या बाबतीत तो अत्यंत प्रोफेशनल आहे. वेळ चोख पाळणारा माणूस. रितेश देशमुख फरदीन खान, संजय गुप्ता असलेली विस्फोट ही माझी पहिली टिपिकल बॉलिवूड स्पेस होती. पण त्यांच्या सेटवरचे वातावरण कसं असेल? ते मला माहित नव्हतं. पण रितेश हा अत्यंत प्रोफेशनल आणि अत्यंत प्रामाणिक नट आहे. आठ वाजताच्या कॉल टाइमला तो त्याची वाक्य पाठ करून हातात स्क्रिप्ट घेऊन रेडी बसलेला असतो. या गोष्टीची मला खूप मदत झाली. रितेश नसता तर हा सिनेमा कसा झाला असता हे मला माहित नाही.”
अशाप्रकारे प्रिया बापटने तिच्या मुलाखतीत अभिनेता रितेश देशमुखचे भरभरून कौतुक केलेले आहे. याआधी प्रिया बापट ही संजय दत्तचा मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात दिसलेली आहे. त्यासोबतच तिची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसिरीज देखील प्रचंड गाजली. या वेब सिरीज नंतर तिला तिची वेगळी ओळख देखील मिळाली. या मुलाखतीत तिने मराठी इंडस्ट्रीत जास्त काम मिळत नाही, अशी खंत देखील व्यक्त केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
तेजस्विनी पंडित आणि सनसेट! मनमोहक फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
लेखक बनणार कॉमेडीयन! हास्याचा धमाका घेऊन येत आहे ‘ऑलमोस्ट कॉमेडी’