अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीची नायिका आहे. अनेक चित्रपटांमधून आपण तिला पाहिलेले आहे. तिच्या डान्सने देखील तिने आतापर्यंत सगळ्यांना प्रभावित केलेले आहे. नुकताच रिलीज झालेला संगीत मानापमान या चित्रपटातील वंदन हो हे गाणे सध्या चर्चेत आहे. अमृताने काही दिवसापूर्वी मुंबईत एक नवीन घर विकत घेतल्याचे सांगितलेले होते परंतु. अमृताने नुकताच तिच्या नवीन घरात गृहप्रवेश केलेला आहे. आणि हा व्हिडिओ देखील तुम्ही यावर शेअर केलेला आहे. तसेच अमृताने तिच्या घराचे नाव देखील खास ठेवलेले आहे.
अमृताने तिचा ग्रह प्रवेश करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिलेले आहे की, “नव्या वर्षाची नवी सुरवात. गृहप्रवेश केला आणि नव्या घराचा उंबरठा ओलांडला. हे आमचं एकम. एकम म्हणजे एक इथून सगळंच नव्याने सुरू होते. इच्छा समाधान प्रेमाने डोळ्यात स्वप्नांचा आभार. अशाप्रकारे अमृताने तिचे नवीन घराचे नाव एकम ठेवलेले आहे, असे सांगितलेले आहे. अमृताचा हे नवीन घर मुंबईतील एका मोठ्या टॉवरमध्ये आहे. हे घर 22 व्या मजल्यावर आहे. 2 बीएचके असलेल्या या घराचा व्हिडीओ तिने शेअर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला आहे.
View this post on Instagram
अमृताने 2024 मध्ये लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर या घरात प्रवेश केलेला आहे. अमृताने नुकतेच काही दिवसापूर्वी रिलीज झालेला लाईक आणि सबस्क्राईब, धर्मराज छत्रपती संभाजी, संगीत मानापमान यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. तसेच तिने हिंदी वेबसिरीजमध्ये देखील काम केलेले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘तो अत्यंत प्रोफेशनल नट आहे’, प्रिया बापटने केले रितेश देशमुखचे कौतुक
लेखक बनणार कॉमेडीयन! हास्याचा धमाका घेऊन येत आहे ‘ऑलमोस्ट कॉमेडी’