टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या नेहा मर्दाची नुकतीच डिलिव्हरी झाली आहे. नेहा प्रेग्नेंट होती हे तर सर्वानाच माहित आहे, मात्र तिची डिलिव्हरी वेळेआधीच झाली आहे. नेहा तिच्या प्रेग्नेंसीच्या काळात सोशल मीडियावर कमालीची सक्रिय होती. तिने या काळात अनेक रील्स आणि तिच्या जीवन शैलीबद्दल माहिती देणारे व्हिडिओ शेअर केले.
सर्व सुरळीत चालू असताना अचानक तिच्या प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स आले. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र तिची इमर्जन्सीमध्ये डिलिव्हरी करण्यात आली. नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तिची प्री-मेच्योर डिलिव्हरी झाली असली तरी ती आणि बाळ सुखरूप असल्याचे सांगितले जात आहे.
View this post on Instagram
नेहाने तिच्या डिलिव्हरीनंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, “माझ्या प्रेग्नन्सीनंतर सर्वांनाच माझ्या बीपीबद्दल चिंता होती. पाचव्या महिन्यात हे अधिकच अवघड झाले. आमच्या डॉक्टरनी आधीच सर्व तयारी केली होती. कॉम्प्लिकेशची शक्यता आधीपासूनच होती.मात्र नशिबाने आज सर्व चांगले झाले. मी आनंदी आहे की आमच्या आयुष्यात एका गोड परीचे आगमन झाले आहे. आम्ही दोघी पण ठीक आहोत.”
नेहाने पुढे म्हटले की, “मी आता लवकरच डिस्चार्ज होऊन घरी जाईल असे वाटत आहे. माझी मुलगी फोर्टनाइट मध्ये आहे. मी तिला माझ्या कुशीत घेण्यासाठी आणि बघण्यासाठी खूपच आतुर झाली आहे. ती खूपच कमी वेळ माझ्याजवळ होती. माझ्या प्री-मेच्योर डिलिव्हरीनंतर लगेच तिला NICU मध्ये भरती केले गेले आहे. ती खूपच बारीक आहे.”
नेहाने पुढे सांगितले की, “आम्ही अजून मुलीच्या नावाबद्दल काहीच विचार केला नाही. आमच्या घरात बाळाची आत्या नाव ठेवते. मला माहिती ती तिचे काम उत्तम पद्धतीने करेल. आम्ही अ वरून नाव ठेवण्याचा विचार करत आहोत. आमची मुलगी नेहमी हसत राहो हीच अपेक्षा आहे. हा आमच्या सगळ्यांसाठीच खूप आनंदाचा आणि भावनिक आहे.” दरम्यान नेहा लग्नाच्या १० वर्षांनी आई झाली आहे. तिने पाटणा येथील उद्योगपती असलेल्या आयुष्मान अग्रवालशी लग्न केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY : जेव्हा चुलत बहिनीने जितेंद्र यांच्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप, ऐकून सगळ्यांनाच बसला होता आश्चर्याचा झटका
आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात पोलिसांना मिळाली गायक समर सिंगची ट्रांजिट रिमांड, होणार मोठा खुलासा?










