शाहरुख खान बॉलिवूडचा किंग. आपल्या रोमॅंटिक अंदाजने संपूर्ण जगाला आपली भुरळ पडलेल्या शाहरुखचा कोणी चाहता नसेल असे होऊच शकत नाही. त्याने त्याच्या चार्मने आणि प्रतिभेने बॉलिवूडमध्ये अढळ स्थान निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘पठाण’सिनेमातून त्याने दाखवून दिले की, अजूनही शाहरुख खान संपलेला नाही. त्याची बाद्शाहत अजूनही टिकून आहे. बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड करणाऱ्या शाहरुखने पुन्हा एकदा एक वेगळे रेकॉर्ड केले आहे.
शाहरुख खानने TIME100 च्या यादीत टॉपवर आपली जागा बनवली आहे. त्याने या यादीत अनेक मोठमोठ्या दिग्गजांना मागे टाकले आहे. टाइम मासिकाने मोस्ट इन्फ्लुएंशियल लोकांची यादी तयार केली आहे, ज्यात शाहरुख खानने टॉप केले आहे. ही यादी वाचकांच्या मतांच्या आधारे बनवण्यात आली आहे. ‘टाइम 100’ यादीत शाहरुख खानने पहिले स्थान पटकावले आहे. अमेरिकी पब्लिकेशनच्या अनुसार यावर्षी 1.2 मिलियन अर्थात 12 लाख मतं मिळाले आहेत. त्यापैकी 4 टक्के मते शाहरुख खानला मिळाली आहेत.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इस्लामी शासनपद्धतीत अधिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी लढा देणाऱ्या इराणी महिलांना मिळाला आहे. ब्रिटनचे राजपुत्र हॅरी यांनी १.९ टक्के मते मिळवत तिसरे स्थान मिळवले आहे. जानेवारीमध्ये प्रकाशित झालेला त्यांचा ‘स्पेअर’ हा स्मरणग्रंथ चर्चेत राहिला होता. त्यांची पत्नी असलेल्या मेगन मर्केल यांना चौथा क्रमांक मिळाला असून, फुटबॉलपटू मेस्सी १.८ टक्के मतांसह पाचव्या स्थानावर आहे. अभिनेत्री मिशेल यो, टेनिसपटू सेरेना विल्यम्स, झुकरबर्ग आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुइझ इनॅशियो लुला दा सिल्वा यांचाही जगभरातील सर्वात प्रभावी शंभर व्यक्तींमध्ये समावेश आहे.
दरम्यान शाहरुख खान मागील अनेक वर्षांपासून त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याने आतापर्यंत १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ सिनेमाने जगभरात १००० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. लवकरच तो ‘डंकी’ आणि ‘जवान’ सिनेमात दिसणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY : जेव्हा चुलत बहिनीने जितेंद्र यांच्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप, ऐकून सगळ्यांनाच बसला होता आश्चर्याचा झटका
आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात पोलिसांना मिळाली गायक समर सिंगची ट्रांजिट रिमांड, होणार मोठा खुलासा?










