Tuesday, July 28, 2026
Home बॉलीवूड पंजाबी पॉप गायकीमधील महारथी हंस राज हंस यांनी राजकारणात देखील मिळवले मोठे यश

पंजाबी पॉप गायकीमधील महारथी हंस राज हंस यांनी राजकारणात देखील मिळवले मोठे यश

संगीत क्षेत्रातील मोठे नाव म्हणून आज हंस राज हंस यांना ओळखले जाते. त्यांना कोणत्याही खास अशा ओळखीची गरज नाही. लोकांना त्यांचे गाणे तुफान आवडते. हंस राजच्या गाण्यांवर लोकं तुफान थिरकतात. आज भलेही हंस राज एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायक असला तरी हे स्थान मिळवणे त्याच्यासाठी तितकेसे सोपे नव्हते. मोठया संघर्षाने त्याने हे यश मिळवले आहे. आज ९ एप्रिल रोजी हंस राज त्याचा ६१ वा वाढदिवस साजरा करत आहे, त्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित काही माहिती.

हंस राज यांचा जन्म ९ एप्रिल १९६२ रोजी पंजाबच्या छोट्या शफीपूर गावात झाला. त्यांचे कुटुंब खूपच गरीब होते. दोन वेळेचे जेवण देखील त्यांच्या नशिबात नसायचे. लहानपणापासूनच त्यांनी खूप संकटं आणि संघर्ष पहिला. त्यांना त्याचे करियर घडवताना देखील हेच करावे लागले. त्याने जालंधरमधून त्याची पदवी पूर्ण केली. संगीतामध्ये सुरुवातीपासूनच रस असल्यामुळे त्याने उस्ताद पूरन शाह कोटी यांच्याकडून संगीताचे धडे गिरवले.

हंस यांना लहानपानपासूनच संगीत क्षेत्रात त्याचे करियर करायचे होते. त्यांनी तरुणपणात चरणजीत आहूजा यांच्याकडून संगीत शिक्षण घेतले. पुढे त्यांनी पंजाबी लोक भक्ती आणि सूफी संगीत गाणी गेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचा पॉप पंजाबी अल्बम देखील प्रदर्शित झाला. मात्र सुरुवातीला त्यांचे अल्बम अपेक्षेप्रमाणे हिट झाले नाही. मात्र सतत प्रयत्न केल्यानंतर त्यांना यश आले, आणि त्यांचे अल्बम हिट होण्यास सुरुवात झाली. पुढे त्यांनी नुसरत फतेह अली खान यांच्यासोबत ‘कच्चे धागे’ सिनेमासाठी काम केले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. गायनात यश मिळवत असताना त्यांनी राजकारणात देखील प्रवेश केला.

हंस राज हंस यांनी २००९ साली शिरोमणी अकाली दलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते २०१४ साली काँग्रेसमध्ये गेले. पुढे २०१६ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि लोकसभा निवडणूक जिंकली.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अण्णांचा हटके अंदाज! नागराज मंजुळने वाजवली हलगी अन् आकाश-सायलीने केला भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

आपल्या विवादित आणि मुक्त वक्तव्यांमुळे सतत चर्चित असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का?

हे देखील वाचा