[rank_math_breadcrumb]

शाहरुख खानच्या ऑनस्क्रीन लेकीचा धक्कादायक खुलासा, 6 वर्षे झुंजली या आनोख्या आजाराशी

‘कुछ कुछ होता है’ हा एक लोकप्रिय हिंदी चित्रपट आहे. या मध्ये अनेक दिग्गज कलाकारांना काम केले आहे. तसेच यात काही बाल कलाकारांनी देखील काम केले. या मध्ये शाहरुख खानच्या मुलीचे ज्या बाल कलाकारांने काम केले होते ते प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. ती आता मोठी झाली आहे. आणि तिचे खरे नाव हे सना (sana)सईद हे आहे. अलीकडेच ती एका भावनिक आणि वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आली आहे. 

एका मुलाखती दरम्यान सनाने खुलासा केला आहे की, ती अनेक वर्षे बुलिमिया या खाण्याच्या गंभीर आजाराशी झुंज देत होती. या काळात, तिला सुरुवातीला या आजाराबद्दल माहिती नसल्यामुळे, अनेक वर्षे पासुन हि गोष्ट लपवत यावर मला  सामना करावा लागला. बारीक असण्याबद्दलचे सामिजक दडपण आणि सततच्या दिसण्याबाबत टिका ऐकुण मी अजुन खचले होते.  तिच्या कॉलेजच्या दिवसांच्या आठवणी सांगताना ती म्हणाली की, तेव्हा ‘साईझ झिरो’ची खूप क्रेझ होती. प्रत्येकजण वजन कमी करण्याच्या टिप्स शोधत होता आणि जिम किंवा ट्रेडमिलवर व्यायाम करत होता. याबाबत जरी चर्चा होत असली तरी मानसिक आरोग्य याबाबत कधीच चर्चा होत नव्हती आणि या क्षेत्रात काम करत असताना अनेकांनी दिसण्यावरुन ही टिका केल्या आणि यांचा खुप दबाव माझ्यावर आला होता.

सनाने सांगितले की ती सुमारे सहा वर्षे या समस्येशी झुंजत होती, या आजारामुळे तिला खुप लाज वाटायची तीने यावर अभ्यास केला आणि आरोग्य सुधारण्यावरील एक पुस्तक वाचल्यानंतर, तिला समजले की ती बुलिमियाने ग्रस्त आहे. आणि निदान झाल्यानंतर तिने या उपाय केले आणि तिला बरे होण्यासाठी 4 वर्षे गेली.

‘रामायण’नंतर रणबीर कपूर ‘धूम 4’मध्ये दिसणार? अभिनेत्याने यावर दिले स्पष्ट उत्तर