दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी ( Shridevi) यांचा ‘मॉम’ हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. आता, जवळपास नऊ वर्षांनंतर, त्याचा सिक्वेल बनणार असून, यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.
‘मॉम २’ मध्ये खुशी कपूर मुख्य भूमिका साकारणार आहे. हा २०१७ च्या हिट चित्रपट ‘मॉम’चा सिक्वेल असून, तो नोव्हेंबर २०२६ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती तिचे वडील, बोनी कपूर करत असून, याचे चित्रीकरण नोएडा आणि ग्रीसमध्ये झाले आहे.
‘फ्री प्रेस जर्नल’मधील वृत्तानुसार, ‘मॉम २’ हा श्रीदेवींच्या त्या अविस्मरणीय भूमिकेशी जोडलेला असेल, ज्यामुळे त्यांना ओळख मिळाली. ‘मॉम’ हा श्रीदेवींचा शेवटचा चित्रपट होता, त्यामुळे हा प्रोजेक्ट खुशी कपूरसाठी खूप भावनिक आणि खास मानला जातो, कारण ती तिच्या आईचा वारसा पुढे नेताना दिसणार आहे.
खुशी कपूरने ‘द आर्चीज’मधून पदार्पण केले होते, परंतु ‘नादानियान’ आणि ‘लव्हयापा’ यांसारख्या चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, ‘मॉम २’ हा तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
वृत्तानुसार, चित्रपटाचे सुरुवातीचे फुटेज पाहिलेल्या एका सूत्राने खुशीच्या अभिनयात लक्षणीय सुधारणा झाल्याचे नमूद केले. त्यांच्या मते, या वेळी खुशीच्या अभिनयात अधिक भावनिक खोली दिसून येते आणि काही प्रसंगांमध्ये तिच्यात श्रीदेवीची झलकही दिसते.
हेही वाचा
ज्युनिअर एनटीआरच्या खांद्याला झाली जखम, डॉक्टरांनी दिला इतके महिने आरामाचा सल्ला










