मराठी मनोरंजनविश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे वयाच्या ७९ वर्षी निधन झाले आहे. अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलेल्या उत्तरा बावकर या दीर्घ आजाराने त्रस्त होत्या.

उत्तरा बावकर यांनी १९८६ मध्ये ‘यात्रा’ या मालिकेतून मनोरंजनविश्वात पदार्पण केले होते. त्यानंतर १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तमस’ या मालिकेतून त्या प्रकाशझोतात आल्या. ‘एक दिन अचानक’, ‘रुक्मावती की हवेली’, ‘द बर्निंग सीजन’, ‘सरदारी बेगम’ यांसारख्या चित्रपटात त्या झळकल्या. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात एक भाऊ, एक बहीण, वहिनी व भाचा असा परिवार आहे.










