Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड ‘या’ दिग्दर्शकावर आणि त्याच्या मुलीवर कोट्यवधी रुपयांचा धोका दिल्याचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल

‘या’ दिग्दर्शकावर आणि त्याच्या मुलीवर कोट्यवधी रुपयांचा धोका दिल्याचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल

निर्माते विक्रम भट्ट आपल्या उत्तम चित्रपटांसाठी ओळखले जातात. विक्रम भट्ट हे जेवढे त्यांच्या चित्रपटांमुळे ओळखले जातात तेवढेच त्यांच्या वादांसाठी आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील ओळखले जातात. नुकतेच त्यांची मुलगी असलेल्या कृष्णा भट्ट विरोधात धोकाधडीचा आरोप लावण्यात आला असून, तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. के सेरा सेरा प्रॉडक्शनने विक्रम भट्ट आणि त्यांची मुलगी असलेल्या कृष्णावर १.४० कोटींच्या धोक्याचा आरोप केला आहे. प्रोडक्शन कंपनीने दावा केला आहे की, विक्रम आणि कृष्णा यांनी जॉईंट प्रॉडक्शनच्या बदल्यात १.४० कोटी रुपये देण्याचे कबुल केले होते, मात्र त्यानंतर त्यांनी याला नकार दिला.

या प्रकणात मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशावरून आंबोली पोलिसांनी विक्रम आणि कृष्णा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सेरा सेरा बॉक्स ऑफिस प्रोडक्शन आणि विक्रम भट्ट यांच्यात मार्च २०२२ मध्ये कॉन्ट्रॅक्ट झाले होते. या नुसार दोघांना मिळणाऱ्या प्रॉफिटमधून ते सामान वाटा घेणार होते.

या प्रकरणात एका अधिकाऱ्याने सांगितले की, १४ मार्च रोजी ही तक्रार दाखल करण्यात आली असून याबाबत अंधेरी कोर्टातून देखील एक ऑर्डर मिळाली आहे. तर विक्रम भट्ट यांच्या वकिलांनी रिजवान सिद्दीकी यांनी सांगितले की, हे सर्व आरोप निराधार आहेत. ते याला हाय कोर्टात आव्हान देणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा