दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे. साऊथ सुपरस्टार्सच्या यादीतील अभिनेते आणि प्रसिद्ध कॉमेडियन अल्लू रमेश यांचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या केवळ ५२ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अल्लू रमेश हे त्यांच्या विशाखापट्टणम येथील घरी असताना त्यांना त्रास जाणवू लागला आणि त्यांना लगेच रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथेच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
या दुःखद घटनेबद्दल दिग्दर्शक आनंद रवी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर करत लिहिले, “पहिल्या दिवसापासून तू माझा सर्वात मोठा पाठिंबा होता, मला अजूनही तुझा आवाज जाणवतो, तू अनेक लोकांच्या हृदयाला हात घातला. तुला विसरणे खूपच अवघड आहे. आरआयपी” या बातमीनंतर त्याच्या फॅन्सला मोठा झटका बसला आहे. संपूर्ण टॉलिवूड सद्य मोठ्या दुखत असून कलाकार आणि फॅन्स सोशल मीडियावर व्यक्त होत अल्लू रमेशला श्रद्धांजली वाहत आहे.

अल्लू रमेश यांनी त्याच्या करियरची सुरुवात रंगभूमीपासून केली. त्यांचा पहिला सिनेमा होता, ‘चिरुजल्लू’. त्यानंतर ते ‘मथुरा वाइन, ‘नेपोलियन’, ‘थोलूबोम्मलाटा’,’वीधी’, ‘ब्लेड बाबाजी’ आदी सिनेमांमध्ये त्यांनी काम केले होते. शेवटचे ते राजेंद्र प्रसाद यांच्या ‘ अनुकोनी प्रयाणम’मध्ये दिसले होते. अल्लू रमेश यांना खरी ओळख मिळवून दिली ती, ‘नेपोलियन’ आणि ‘थोलूबोम्मलाटा’ या चित्रपटांनी.
दरम्यान अल्लू रमेश यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांना एक पत्नी आणि दोन मुलं आहेत. त्यांनी अनेक वेबसिरीज आणि टेलिव्हिजन शो मध्ये देखील काम केले आहे,
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा










