Thursday, September 3, 2026
Home बॉलीवूड ७ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमनासाठी सज्ज आहे हा अभिनेता, ‘रूपा’मधून नव्या अध्यायाची करणार सुरुवात

७ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमनासाठी सज्ज आहे हा अभिनेता, ‘रूपा’मधून नव्या अध्यायाची करणार सुरुवात

गोविंदा हा एक बॉलिवूड मधील लोकप्रिय कलाकार आहे. त्याचे सध्या कोणते चित्रपट येत नसले तरी 90 दशकात त्याचेच चित्रपट लोकप्रिय होते आणि त्या काळात त्याने एका खुप सारे एकापाठोपाठ चित्रपट दिले आहेत. मात्र आता पाहीले तर तो या चित्रपटापासुन दुर आहे. मात्र त्याच्या चाहते आजही त्याच्या बाबतच्या सर्वच अपडेट साठी उत्सुक असतात. तर त्याच्या या चाहत्यांसाठी आता एक आंनदाची बातमी आहे. ती म्हणजे तो जवळपास 7 वर्षानंतर मोठ्या पडद्यावरील पुनरागमन करत आहे.

गोविंदा पुन्हा एका अनेक वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि ही घोषणा स्वतः गोविंदाने केली आहे. गोविंदा ‘रूपा’ या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. एक वृत्तानुसार, गोविंदाने एका पत्रकार परिषदेत मोठ्या पडद्यावरील पुनरागमनाची आणि त्याच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा केली. यावेळी त्याच्यासोबत एक नवीन अभिनेत्रीही दिसली, जी या आगामी चित्रपटात गोविंदासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. चित्रपटांमध्ये पुनरागमनाची घोषणा करताना गोविंदा म्हणाला की, लोकांनी ज्या प्रकारे त्याच्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळेच तो अधिक मजबूत झाला आहे. पण शेवटी नशीबाचा खेळ आहे. असे अभित्याने म्हणले आहे.

गोविंदा (govinda)त्याच्या आगामी चित्रपटाबाबत बोलताना म्हणाला की, रुपा हा चित्रपट तरुणांसाठी आहे. आणि हा चित्रपट तरुण पिढिला आवडेल अशी त्याने आशा व्यक्त केली आहे. या वेळी त्याने एक खंत व्यक्त केली तो म्हणला मला लोक नेहमीच म्हणतात की, मी आता चित्रपटांमध्ये दिसणार नाही. पण मी नेहमीच नवीन सुरुवात करतो. आणि देवाकडे प्रार्थना करतो की, मी पाहलेलं सप्न हे या चित्रपटाच्या रुपाने पुर्ण होईल.

हेही वाचा

गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानूला या गंभीर आजाराची झाली लागण; रुग्णालयात दाखल

हे देखील वाचा