Saturday, December 28, 2024
[aioseo_breadcrumbs]

अर्पिता शर्माच्या ईद पार्टीत धोनीची पत्नी अन् लेक झिवाची राॅयल एन्ट्री, साक्षीच्या लूकने चाहत्यांना पाडली भूरळ

शनिवारी देशभरात ईदचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी, स्टार्स त्यांच्या चाहत्यांना खास शुभेच्छा देताना दिसले. सलमान खानपासून शाहरुख खानपर्यंत अनेकांनी आपल्या प्रियजनांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्याच वेळी, या खास प्रसंगी अनेक स्टार्सनी त्यांच्या घरी ईद पार्टी ठेवली.

अशा परिस्थितीत दरवर्षीप्रमाणे याही वर्षीही सलमान खानची लाडकी बहीण अर्पिता खान शर्मा आणि तिचा मेहुणा आयुष शर्मा यांनीही त्यांच्या घरी ईद पार्टी ठेवली. या पार्टीत बॉलिवूडपासून ते क्रीडा जगतातील अनेक दिग्गज मंडळी पोहोचली होती. त्याचवेळी महेंद्रसिंग धोनीची पत्नी आणि लेक झिवा यांनी पार्टीत हजेरी लावून चार चांद लावले.

महेंद्र सिंगची पत्नी साक्षी आणि लेक झिवा अर्पिता खान शर्मा आणि आयुष शर्मा यांच्या ईद पार्टीत पोहोचले. यादरम्यान साक्षी आणि झिवा दोघेही पारंपरिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत हाेत्या.साक्षीने साधा क्रीम रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. यासह तिने आपले केस मोकळे साेडले हाेते, तर दुसरीकडे, झिवाच्या लूकबद्दल बोलायचे झाले, तर लहान झिवाने तिच्या आईसोबत मॅचिंग ड्रेस कॅरी केला आहे, ज्यामध्ये ती खूप क्यूट दिसत हाेती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

एमएस धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहते त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत. दोघींचा सिंपल लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. झीवाला पाहून चाहते धोनीची मुलगी किती मोठी झाली आहे, अशा कमेंट करत आहेत. यासाेबतच चाहते झीवावर प्रेमाचा वर्षाव करत असून हा व्हिडिओ आतापर्यंत अनेक वेळा पाहिला गेला आहे.(bollywood mahendra singh dhoni sakshi dhoni and daughter ziva attend arpita khan sharma eid party video goes viral on social media )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ कारणामुळे मनोज बाजपेयींना आवडत नव्हते त्यांचे नाव, पुढे बदलून ठेवले समर नाव

साखरपुडा एकीशी लग्न दुसरीशी! सुशांतच्या एक्स मॅनेजरच्या हाेणाऱ्या नवऱ्याचे लग्नातील फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा