Thursday, April 18, 2024

साखरपुडा एकीशी लग्न दुसरीशी! सुशांतच्या एक्स मॅनेजरच्या हाेणाऱ्या नवऱ्याचे लग्नातील फाेटाे व्हायरल

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिने 8 जून 2020 रोजी मुंबईतील इमारतीवरून उडी मारून आत्म’हत्या केली. त्यानंतर काही दिवसांनी अभिनेता सुशांत सिंगचा मृतदेह त्याच्या मुंबईतील घरी सापडला होता. अभिनेता आणि त्याच्या व्यवस्थापकाच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित केले. तर दिशाची आधीच एंगेजमेंट झाली होती. तिने टीव्ही अभिनेता रोहन राय याच्याशी साखरपुडा केला हाेता आणि दोघेही लवकरच लग्न करणार होते. मात्र, नशिबाला काही वेगळेच मंजूर होते. अशात अलीकडेच रोहन रायबद्दल एक चांगली बातमी समोर आली आहे की, त्याने लग्न केले आहे.

टिव्ही अभिनेता रोहन राय (rohan rai) 22 एप्रिलला लग्न बंधनात अडकला. अभिनेत्याने त्याची को-स्टार शीन दासशी लग्न केले आहे. हाे दाेन्ही कलाकार ‘पिया अलबेला’मध्ये एकत्र काम करत होते. अशात या जोडप्याने काश्मीरमध्ये लग्न केले. कारण, शीन ही काश्मीरची रहिवासी आहे. दोघांनीही कुटुंबीय आणि मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत काश्मिरी रितीरिवाजानुसार लग्न केले. लग्नाची माहिती दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. खऱ्या आयुष्यात दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे असले तरी’पिया अलबेला’ या मालिकेत त्यांनी बहिण – भावाची भूमिका साकारली आहे.

दिशाच्या मृत्यूनंतर रोहनने सोशल मीडियातून बराच ब्रेक घेतला होता. त्याचवेळी शीनने रोहनला कठीण प्रसंगी मैत्रीण म्हणून साथ दिली आणि आयुष्यात पुढे जाण्यास मदत केली. दिशा ही सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. तिने मुंबईतील 14 मजली इमारतीवरून उडी मारून आत्म’हत्या केली. दिशाच्या मृत्यूनंतर सर्वांनाच धक्का बसला होता.(bollywood actor sushant singh rajput manager disha salian fiance rohan rai sheen das actor piya albela got married see photos)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ कारणामुळे मनोज बाजपेयींना करायची होती आत्महत्या, अशाप्रकारे वाचला होता जीव

‘या’ कारणामुळे मनोज बाजपेयींना आवडत नव्हते त्यांचे नाव, पुढे बदलून ठेवले समर नाव

हे देखील वाचा