Monday, April 15, 2024

सलमान खानच्या ‘मूव्ह ऑन’ कमेंटवर शहनाजने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, ‘सलमान सर नेहमी…’

शहनाज गिल ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. शहनाज प्रोफेशनल लाईफसोबतच तिच्या पर्सनल लाईफबद्दलही खूप चर्चेत असते. बिग बॉस दरम्यान शहनाज गिल दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या जवळ आली होती. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. मात्र, सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाज खूपच तुटली. करिअरच्या बाबतीत शहनाज भलेही पुढे जात असेल, पण वैयक्तिक आघाडीवर ती अद्याप सिद्धार्थच्या आठवणीतून सावरलेली नाही. अशात अलीकडेच ‘किसी का भाई किसी की जान‘च्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी सलमानने तिला पुढे जाण्याचा सल्ला दिला, ज्यावर शहनाजने माैन साेडले आहे.

तर झाले असे की, अलीकडेच एका संभाषणादरम्यान शहनाज गिलला सलमान खानच्या कमेंटबद्दल विचारण्यात आले. यावर ती म्हणाली, ‘सलमान सर नेहमी म्हणतात की, तुझ्यात खूप क्षमता आहे. तु कधीही थांबू नकाे आणि दुःखी होऊ नकाे. फक्त कामावर लक्ष केंद्रित कर. तु तुझ्या करिअरमध्ये खूप पुढे जाशील.’ शहनाज पुढे म्हणाली, ‘मी नेहमीच मेहनत करत राहीन.’

यासाेबतच चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात पत्रकार परिषदेदरम्यान शहनाजला सलमानसोबत डेब्यू करण्याच्या स्वप्नाबद्दल विचारण्यात आले. यावर शहनाज काही बोलू लागण्यापूर्वीच सलमान खान म्हणाला, ‘मी म्हणतोय, पुढे जा… पुढे जा!’ यानंतर शहनाज गिलने अभिनेत्याशी सहमती दर्शवली आणि म्हणाली, ‘झाले आहे.’

मात्र, सलमान खानने शहनाजला दिलेल्या सल्ल्याने चाहते चांगलेच गोंधळले होते. काहींना असे वाटले की, तो शहनाजला व्यावसायिक जीवनात पुढे जाण्याचा सल्ला देत आहे, तर काहींचा असा अंदाज आहे की, सलमान खानने शहनाजला सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीतुन बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.

‘किसी का भाई किसी की जान’ बद्दल बाेलायचे झाले, तर हा चित्रपट फरहाद सामजी यांच्या दिग्दर्शनाखाली बनला आहे. या चित्रपटात सलमान खान आणि शहनाज गिल यांच्याव्यतिरिक्त पूजा हेगडे, पलक तिवारी, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, भूमिका चावला आणि विजेंदर सिंग यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.( bollywood actress shehnaaz gill opens up on salman khan move on comment )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘खतरो के खिलाडीची ऑफर नाही’ ‘या’ टीव्ही अभिनेत्याने दिला त्याच्या शोमध्ये सहभागाच्या चर्चांना पूर्णविराम

पन्नाशी उलटलेला सलमान खान त्याच्या ‘या ड्रिमगर्ल’च्या आठवणीत आहे अविवाहित, स्वतःच केला खुलासा

हे देखील वाचा