टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील चर्चेत असणारे आणि ओळखीचे कपल म्हणजे बरखा बिष्ट आणि इंद्रनील सेनगुप्ता. विविध चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये दिसणाऱ्या या जोडीचे अमाप फॅन्स आहेत. मात्र आता यांच्या जोडीबद्दल एक बातमी समोर येत आहे. लग्नाच्या तब्बल १३ वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेणार असल्याचे जाहीर केले आहे. या दोघांनी एक मीरा नावाची मुलगी देखील आहे. एका मुलाखतीदरम्यान बरखाने याबद्दल सांगितले आहे.
View this post on Instagram
नुकतीच बरखाने एका मोठ्या वृत्तपत्राला मुलाखत दिली यावेळी तिने त्यांच्या घटस्फोटाबद्दल सांगितले. ती म्हणाली, “हो आम्ही लवकरच घटस्फोट घेणार आहोत. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णयांपैकी एक निर्णय आहे. मी एक एकटी आई आहे. आणि माझी मुलगा मीरा माझी प्राथमिकता आहे. मी सध्या ओटीटीवर चांगले काम करत असून, टीव्ही आणि चित्रपटांमधील चांगल्या संधीसाठी नेहमीच तयार आहे.” सध्या बरखा आणि मीरा एकत्र राहत आहेत.
मात्र बरखाने यावेळी मुलाखतीमध्ये त्यांच्या घटस्फोटाच्या करणाबद्दल कोणताच खुलासा केला नाही. तिला कारण विचारल्या गेल्यानंतर देखील तिने ते सांगण्यास नकार दिला. मात्र २०२१ मध्ये आलेल्या काही मीडियामधील माहितीनुसार इंद्रनीलचे एका बंगाली अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध होते. याचमुळे त्यांच्या नात्यात कटुता आली. मात्र हेच त्यांच्या घटस्फोटाचे खरे कारण आहे की नाही याबाबत माहिती उपलब्ध नाही.
View this post on Instagram
दरम्यान एक काळ असा होता, जेव्हा बरखा आणि इंद्रनील टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध कपल होते. त्यांनी पहिल्यांदा २००६ साली ‘प्यार के दो नाम… एक राधा एक श्याम’ या शोमध्ये एकत्र काम केले. तेव्हाच त्यांची भेट झाली. त्यानंतर ते प्रेमात पडले आणि २००८ साली त्यांनी लग्न केले. २०२१ सालीचा बरखा आणि इंद्रनील यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या. मात्र तेव्हा यावर दोघांनी भाष्य करणे टाळले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-