आज आपण या लेखात त्या अभिनेत्रींबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांनी ‘सीता’ची भूमिका साकारली आहे. यांतील काही अभिनेत्री खूप चर्चेत राहिल्या, तर काहींना ट्रोल व्हावे लागले होते.
१. दीपिका चिखलिया- रामायण (१९८७)
रामानंद सागर दिग्दर्शित ‘रामायण’ ही मालिका श्री रामच्या जीवनावर बनवलेल्या सर्व मालिका आणि चित्रपटांमध्ये सर्वाधिक पसंत करण्यात आली होती. ज्यावेळी ही मालिका लॉकडाऊनदरम्यान टीव्हीवर प्रसारित झाली, त्यावेळी अनेक वर्ष जुने टीआरपीचे विक्रम मोडीत काडले गेले.
या मालिकेत सीताची भूमिका अभिनेत्री दीपिका चिखलियाने साकारली होती. सीताची भूमिका साकारणाऱ्या दीपिकाला इतकी पसंती मिळाली की, चाहते चक्क तिची पूजा करू लागले होते. या मालिकेत दीपिका आभुषणांशिवाय देखील सुंदर दिसत होती. या मालिकेत ‘श्री राम’ यांची भूमिका अरुण गोविल यांनी साकारली होती.
२. स्मिता माधव- बाल रामायणम् (१९९६)
सन १९९६ मध्ये तेलुगू भाषेतील ‘बाल रामायणम्’ हा चित्रपट बनवला होता. यामध्ये ‘सीता’ची भूमिका अभिनेत्री स्मिता माधवने साकारली होती. बाल कलाकारांना घेऊन तयार केलेला हा आतापर्यंतच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक चित्रपट होता. या चित्रपटाला सर्वोत्तम बाल चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारदेखील मिळाला होता.
चित्रपटात ज्यूनियर एनटीआर या अभिनेत्याने श्री राम यांची भूमिका साकारली होती. स्मिता माधव त्यावेळी केवळ १० वर्षांच्या होत्या, ज्यावेळी त्यांनी ही भूमिका साकारली होती. सध्या त्या एक शास्त्रीय डान्सर आणि गायिका आहेत.
३. शिल्पा मुखर्जी- जय हनुमान (१९९७)
प्रसिद्ध अभिनेता संजय खान यांनी जेव्हा टेलिव्हिजनच्या दुनियेत पाऊल ठेवले होते, त्यावेळी त्यांनी सन १९९७ मध्ये ‘जय हनुमान’ या मालिकेचे दिग्दर्शन केले होते. ही मालिका सन २००० पर्यंत चालली होती. ही मालिका पूर्णत: ‘श्री राम’ यांचे भक्त हनुमान यांच्यावर आधारित होती.
या मालिकेत सीताची भूमिका अभिनेत्री शिल्पा मुखर्जी यांनी साकारली होती. त्या अधिक काळासाठी अभिनयाचा भाग राहिल्या नाही. आता त्या एक मुक्त छायाचित्रकार बनल्या आहेत.
४. स्म्रिती इराणी- रामायण (२००२)
रामानंद सागर यांची मालिका ‘रामायण’ला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. त्यानंतर बीआर चोप्रा आणि रवी चोप्रा यांनी मिळून ‘रामायण’ ही मालिका तयार केली होती. यामध्ये ‘श्री राम’ यांची भूमिका नीतिश भारद्वाज आणि ‘सीता’ची भूमिका अभिनेत्री आणि राजकीय मंत्री स्म्रिती इराणीने साकारली होती.
बीआर चोप्रा यांचा प्रयत्न होता की, त्यांच्याही मालिकेला रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेप्रमाणे प्रेम मिळावे. त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली नसली, तरीही त्यांची मालिका चाहत्यांनी पसंत केली होती. सोबतच मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांनाही चाहत्यांनी पसंत केले.
स्म्रिती त्यावेळी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ यांसारख्या मालिकेतून प्रसिद्धी मिळवत होती. त्या मालिकेतून तिला एक सुसंस्कृत सून म्हणून ओळखले जाऊ लागले.
५. नम्रता थापा- रावण (२००६)
‘श्री राम’ यांची देशभरात पूजा केली जाते. परंतु काही अशी ठिकाणे आहेत, जिथे रावणालाही योग्य समजले जाते. सन २००६ मध्ये ‘रावण’ ही मालिका निर्माण करण्यात आली होती. या मालिकेत रावणाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले होते.
या मालिकेत रावणाची भूमिका नरेंद्र झा यांनी केली होती, तर श्री राम यांच्या भूमिकेत अभिनेता दिवाकर पुंडीर हे होते. सीताच्या भूमिकेसाठी मालिकेचे दिग्दर्शक रंजन सिंग यांनी अभिनेत्री नम्रता थापाची निवड केली होती.