अं’मली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली बाटला हाऊस फेम अभिनेत्री क्रिसन परेरा २६ दिवस दुबईमधील शारजाह जेलमध्ये होती. नुकतीच तिची या आरोपात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आता लवकरच क्रिसन भारतात परतत आहे. क्रिसनने सांगितले की, तिला या प्रकरणात अडकवण्यात आले होते, जेव्हा सत्य समोर आले, तेव्हा तिला जेलमधून सोडण्यात आले. मात्र याआधी तिने सोशल मीडियावर तिच्या या २६ दिवसांमधील आरोपांबद्दल लिहिले आहे. तिने एक पत्र लिहीत तिला आलेले अतिशय वाईट आणि किळसवाणे अनुभव तिने सर्वांसोबत शेअर केले आहेत.
View this post on Instagram
क्रिसनने एक पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.या पत्रात ती लिहिते, “प्रिय योद्धा, मला जेलमध्ये पेन आणि कागद शोधण्यासाठी मला तीन आठवडे आणि पाच दिवसांचा वेळ लागला. मी माझे केस ‘टाइड’ या डिटर्जंट पावडरने धुतले आणि टॉयलेटच्या पाण्याने कॉफी बनवली. मी हिंदी चित्रपट पाहिले. मला माझ्या महत्वाकांक्षेने जेलमध्ये पोहचवले. हे लक्षात आल्यावर माझ्या डोळ्यात कधी कधी पाणी पण यायचे. आपली संस्कृती, आपले चित्रपट आणि टीव्हीवरील ओळखीचे चेहरे पाहून मला हसायला यायचे. मला भारतीय असल्याचा आणि बॉलिवूडशी संबंधित असल्याचा अभिमान आहे. मी या घाणेरड्या खेळाची फक्त एक छोटी मोहरा आहे. मी त्या सर्वाना धन्यवाद म्हणते ज्यांनी मला या कठीण काळात मदत केली आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी मदत केली. आपण एका शक्तिशाली देशाचा भाग आहोत, आणि मी आता भारतात परतण्याची वाट पाहू शकत नाही. माझे जीवन वाचवण्यासाठी आभारी आहे. ” सध्या क्रिसनने लिहिलेले हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तिने किती वाईट गोष्टी अनुभवल्या हे समजते.
तत्पूर्वी मुंबईमधील बेकरी मालक असलेल्या अँथनी पॉलने क्रिसन परेराला या अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात अडकवले होते. तिला दुबईला एका ट्रॉफीमध्ये अंमली पदार्थ सापडल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोषी ठरवून शारजाह येथील तुरुंगात पाठवले. २६ दिवसानंतर आरोपी रवी आणि अँथनी पॉल यांचे हे नाटक बाहेर आले. आणि आता अभिनेत्री क्रिसन परेराची तुरुंगातून सुटका करण्यात आली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
समंथा रुथ प्रभूची दहावीची मार्कशीट झाली व्हायरल, गणिताचे आकडे पाहून तुम्ही व्हाल थक्क
सोनाक्षी सिन्हा 27 मुलींच्या शोधात निघाली एकटीच, अंगावर काटा आणणारा ‘दहाड’चा ट्रेलर रिलीज