सध्याच्या घडीला केरळ सिनेसृष्टीची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. नुकतीच फिल्म एम्पलाइज फेडरेशन ऑफ केरला, असोसिएशन मल्याळम मूवी आर्टिस्ट आणि प्रोड्यूसर्स असोसिएशनची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसिद्ध अभिनेता शेन निगम आणि श्रीनाथ भासी यांना बॅन केले आहे. निर्मात्यांनी या दोघं सुपरस्टार्सवर बेशिस्तपणा आणि इतरही अनेक आरोप केले आहेत. यावर आता शेन निगमने त्याची बाजू मांडली आहे.
View this post on Instagram
एका मोठ्या वृत्तपत्राच्या माहितीनुसार बॅन करण्याच्या वादावरून शेनने त्याचा चित्रपट असलेल्या ‘आरडीएक्स’च्या निर्मात्या सोफिया पॉल यांना एक पत्र लिहिले आहे. ते पत्र सोशल मीडियावर लीक होत व्हायरल झाले आहे. या पत्रात शेनने लिहिले आहे की, “मी सन्मानपूर्ण बोलू इच्छितो की, ज्या सिनेमात मला मुख्य अभिनेता म्हणून घ्या आले आहे, त्यासंबंधी आता माझ्या मनात अनेक प्रश्न उत्पन्न होत आहे. चित्रपटाच्या कॉन्ट्रॅक्टनुसार मला सूचना दिली गेली होती की, अजून दोन कलाकारांना माझ्यासोबत मुख्य भूमिकेत घेण्यात येणार आहे. या सिनेमात मला रॉबर्ट नावाची भूमिका देण्यात आली होती. मात्र सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अशा काही गोष्टी घडल्या ज्यांनी मला विचार करण्यास भाग पाडले आहे. जी भूमिका मी साकारत आहे, तिला पाहिजे तेवढे महत्व मिळत नाही.”
पुढे शेन निगमने लिहिले, “निर्मात्यांनी मला वचन दिले होते की, मी सिनेमात मुख्य भूमिकेत आहे, आणि रॉबर्ट हे मुख्य पात्र आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, सिनेमाच्या मार्केटिंग, ब्रॅंडिंग आणि प्रमोशनवेली माझ्या भूमिकेला महत्व द्या. सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी देखील माझ्या भूमिकेला महत्व द्यायला पाहिजे जेणेकरून ते लोकांच्या नजरेस येईल.” निर्मात्यांनी शेंवर आरोप केला आहे की, तो दारूच्या नशेत सेटवर आला आणि त्याने सेटवर उपस्थित लोकांसोबत खालच्या भाषेत शिवीगाळ केली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
समंथा रुथ प्रभूची दहावीची मार्कशीट झाली व्हायरल, गणिताचे आकडे पाहून तुम्ही व्हाल थक्क
सोनाक्षी सिन्हा 27 मुलींच्या शोधात निघाली एकटीच, अंगावर काटा आणणारा ‘दहाड’चा ट्रेलर रिलीज