बॉलीवूडमध्ये अशा एकापेक्षा एक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या अभिनयात आणि साैंदर्यात चाहत्यांना घायाळ करण्याची ताकद आहे. अशात चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्टारबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे असते, जे त्यांना त्यांच्या स्टार्सच्या आणखी जवळ आणते. नुकतेच यूपी बोर्डाचे इयत्ता 10वी आणि 12वीचे निकाल लागले आहेत. अशा परिस्थितीत चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत की, त्यांचे आवडते स्टार अभ्यासात कसे होते, त्यांना किती टक्के मिळाले हाेते? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही अभिनेत्रींच्या 10वीच्या निकालाविषयी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या आवडत्या अभिनेत्रीला दहावीत किती टक्के मिळाले हाेते.
साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (samantha ruth prabhu) हिचा 10वीचा निकाल नुकताच व्हायरल झाला आहे. अभ्यासाच्या बाबतीत ही अभिनेत्री खूप हुशार होती आणि 10वीत या अभिनेत्रीला 89 टक्के गुण मिळाले हाेते.
View this post on Instagram
जान्हवी (Janhvi Kapoor) ही श्रीदेवीची मुलगी आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीत अल्पावधीतच स्वत:चे स्थान निर्माण करणारी जान्हवी कपूर हिला दहावीत 84 टक्के गुण मिळाल्याचे बोलले जाते.
View this post on Instagram
आपल्या स्टाईलने लाखो हृदयांवर राज्य करणारी ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री दिशा पटानी (disha patani) अभ्यासात फारशी हुशार नव्हती. तिला दहावीत 64 टक्के गुण मिळाले होते. अगदी लहान वयातच दिशाने अभिनयाच्या जगात नाव कमवण्यासाठी मेहनत करायला सुरुवात केली आणि आज दिशा टाॅप अभिनेत्रींपैकी एक आहे.
View this post on Instagram
बॉलिवूड इंडस्ट्रीला एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारी अनुष्का शर्मा अभ्यासात खूप हुशार होती. तिला तिच्या कामाची जितकी आवड आहे, तितकीच तिने अभ्यासात मेहनत घेतली आहे. अनुष्का ही उत्कृष्ट विद्यार्थिनी असून तिला दहावीत 93टक्के गुण मिळाले होते.( bollywood actress 10th class marks )
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अर्जुन रामपाल वयाच्या 50व्या वर्षी होणार चौथ्यांदा बाप, अभिनेत्याच्या प्रेयसीने दिली गाेडबातमी
धक्कदायक! ‘या’ फॅशन डिझायनरने केली आत्महत्या, इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत म्हणाली, “माझा हा शेवटचा व्हिडीओ…”